वहाडणे यांच्या हाकेवर भाजप-सेना नगरसेवकांनी दिलेला शब्द पाळावा, काळे गटासह मित्रपक्षांचे आवाहन
BJP-Sena corporators should keep their word on Vahadane’s call, appeal to allies including Kale group
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lThu 16sep 2021, 19:30Pm.
कोपरगाव : नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी उच्च न्यायालयातून ते’ स्थगिती आदेश उठवा ही त्यांनी केलेली विनंती भाजपसेना नगरसेवकांनी मान्य केली होती. यावर भूमिका स्पष्ट करतांना काळे गटासह मित्रपक्षांनी भाजप-सेना नगरसेवकांनी जनतेची माफी मागून वहाडणे यांच्या हाकेवर स्थगिती मागे घेण्याचा दिलेला शब्द आता तरी पाळावा असे आवाहन पत्रकार परिषद घेऊन भाजप सेना नगरसेवकांना केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले म्हणाले, सभागृहात विरोध केला, जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर न्यायालयात जाऊन स्थगिती आणून इतिहास घडविला त्यांनी आमच्यावर केलेल्या आरोपाला शेंडा ना बुडखा, आठ महिन्यानंतर त्यांना वहाडणे यांच्या हाकेची उपरती झाली, आज २२ कामांना आमचा विरोध नसल्याचे ते साफ खोटे सांगत आहेत, कोपरगाव च्या लोकांना पाणी हवे आहे ते निळवंडेतून येवो अथवा नांदूर-मधमेश्वर मधून, मागील पाच वर्षात निळवंडे चे पाणी आणण्यासाठी तुमचे हात कोणी धरले होते ? आठ दिवसात कामे सुरू करून शब्द पाळल्याचे जनतेला दाखवून द्या, कालची भूमिका कायम ठेवा बोलू नका सिद्ध करून दाखवा असे आवाहन करतानाच आम्हीच करू ही दादागिरी बरी नव्हे असा गंगुले यांनी शेवटी लगावला, गटनेते वीरेन बोरावके म्हणाले, आम्ही वकील दिला तो कामे होण्यासाठी कामे रोखण्यासाठी नाही, सत्ताधारी नगरसेवकांनी काल जी भूमिका घेतली ती याआधीच घेतली असती तर आज नागरिकांना रस्त्याचा त्रास सहन करावा लागला नसता, ठीक आहे आता तरी या निर्णयावर ठाम राहा, विकास होणे यात वावगे काय आहे? असा सवालही त्यांनी शेवटी केला. मंदार पहाडे म्हणाले, आमदार आशुतोष काळे यांनी सुरुवातीपासूनच वहाडणे यांना विकासासाठी पाठिंबा दिलेला आहे व पुढेही देणार, तेंव्हा राजकीय डावपेच खेळून जनतेला वेठीस धरून दिशाभूल करण्याचे काम कोण करत आहे, हे जनतेला चांगलेच ठाऊक आहे. असेही ते म्हणाले, शिवसेना शहर प्रमुख कलविंदर सिंग दडियाल म्हणाले, आमची भूमिका विकासाबरोबरच आहे, मग तो विकास काळे , कोल्हे, वहाडणे वा कोणीही करो सेना त्यांच्याबरोबरच राहिल, जनतेला दिलासा देण्यासाठी रस्त्यावर मुरूम टाकला होता. असा खुलासा त्यांनी यावेळी केली. भरत मोरे म्हणाले, यांना आजच वहाडणे यांची हाक कशी ऐकू आली, आली आहे तर ठीक आहे.मग राजकारण बाजूला ठेवून आपण विकासाची कामे होऊ द्या, अशी विनंती केली, मनसेचे अनिल गायकवाड यांनी विकास जिथे मनसे तिथे हा राज ठाकरे यांचा आदेश असल्याचे सांगितले. नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी सुद्धा शब्द पाळण्याची आव्हान केले. पत्रकार परिषदेसाठी सुनील गंगूले, वीरेंद्र बोरावके, मंदार पहाडे कलविंदरसिंग दडियाल, भरत मोरे, धरमशेठ बागरेचा, कृष्णा आढाव, बाळासाहेब रूईकर, दिनकर खरे, नवाज कुरेशी, फकिर कुरेशी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक बाळासाहेब रुईकर यांनी केले. शेवटी नगरसेवक रमेश गवळी यांनी आभार मानले