पंतप्रधान मोदींसाठी “धन्यवाद पोस्टकार्ड” मोहीम राबवणार – विवेक कोल्हे
PM to launch “thank you postcard” campaign for Modi – Vivek Kolhe
सेवा व समर्पण सप्ताह वृक्ष रोपण व रक्तदान शिबिर संपन्नService and Dedication Week Tree Planting and Blood Donation Camp
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lFir17sep 2021, 14:30Pm.
कोपरगाव : भारताला महासत्ता बनविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या राष्ट्रभक्त, त्यागी, समर्पित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने कोपरगाव भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोदी यांनी दिलेल्या विविध योजनेतील लाभार्थी मार्फत “धन्यवाद, मोदी” पोस्टकार्ड मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती संजीवनी युवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी रक्तदान शिबिर प्रसंगी पत्रकारांना दिली.
शहरातील कलश मंगल कार्यालयामध्ये आज शुक्रवारी (१७) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव भारतीय जनता पार्टीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विवेक कोल्हे म्हणाले, रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान‘ असे समजले जाते. कोरोनामुळे रक्तदान ही आजच्या काळाची गरज आहे. अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात. त्यामुळे तरुणाईने अधिकाअधिक रक्तदान करण्याचे आवाहन केले. शिबिरात जवळपास वर संजीवनी युवा प्रतिष्ठान व भायुमोच्या सदस्यांनी रक्तदान केले. सामान्य जनतेस हा मदतीचा हात मिळावा, या अनुषंगाने हा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. विवेक कोल्हे म्हणाले, याशिवाय शासकीय कार्यालयाच्या आवारात पंतप्रधान सुकन्या समृद्धी योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री जन धन योजना, पंतप्रधान आवास योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना,आयुष्मान भारत,प्रधानमंत्री पीक विमा योजना, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना,अटल पेन्शन योजना, पंतप्रधान उज्ज्वला योजना, यासह मोदी यांनी अनेक सरकारी योजना सुरू करण्याचे काम केले आहे. त्या प्रत्येक योजनेच्या नावाने वृक्षारोपण करण्यात येणार आहेत. असे इतर अनेक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. ७ ऑक्टोबर पर्यंत सेवा व समर्पण सप्ताहाच्या माध्यमातून हे कार्यक्रम सुरू राहणार आहेत. यावेळी अमृत संजीवनी चे चेअरमन पराग संधान, गटनेते रवींद्र पाठक उपनगराध्यक्ष हरीश कुरेशी विजय आढाव, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शरद खरात, विक्रम पाचोरे, भायुमोचे,तालुका अध्यक्ष बाळासाहेब पानगव्हाणे, शहराध्यक्ष अविनाश पाठक, महिला शहराध्यक्ष वैशाली आढाव विनोद राक्षे, गोपीनाथ गायकवाड नगरसेवक भारतीय भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. अमृत संजीवनी चे चेअरमन पराग संधान यांचा वाढदिवस असल्याने त्यांचा सत्कार विवेक कोल्हे यांनी केला, आपल्या वाढदिवसानिमित्त पराग संधान यांनी एक बाटली रक्त दान केले. संजीवनी ब्लड बँकेच्या वतीने डॉ. सौ.पाटील, डॉ.सौ. रणदिवे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पाडले.