शिर्डीचे आंतरराष्ट्रीय महत्व वृद्धिंगत करण्यासाठी श्रद्धा व विकासाची सांगड घालू- आ. आशुतोष काळे
Let’s combine faith and development to enhance the international importance of Shirdi. Ashutosh Kale
स्वीकारला शिर्डी संस्थानचा कार्यभार Accepted the charge of Shirdi Sansthan
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lFir17sep 2021, 16:50Pm
कोपरगाव : गेल्या काही वर्षांपासून शिर्डी संस्थानचा कारभार प्रशासकीय मंडळाकडे न्यायालयाच्या नियंत्रणाखाली तज्ज्ञ समितीमार्फत पाहिला जात होता.मात्र काही महिन्यांपूर्वी पूर्वी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य शासनाला साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळ नेमण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या सूचनेनुसार महाविकास आघाडी सरकारने गुरुवार (दि.१६) रोजी राजपत्र जाहीर करून कोपरगाव तालुक्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार आशुतोष काळे यांची शिर्डी साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून शुक्रवार (दि.१७) रोजी सकाळी त्यांनी संस्थानच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला.
यावेळी श्री साईबाबा संस्थान ट्रस्टचे सर्व नवनिर्वाचित विश्वस्त, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्रीताई बानायत व शिर्डी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष आ.आशुतोष काळे म्हणाले की, संस्थानच्या अध्यक्षपदी निवड ही कोरोना संकटात निस्वार्थ भावनेतून कोरोना बाधित रुग्णांची करीत असलेल्या सेवेचा साईबाबांचा आशीर्वाद आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा छोटासा कार्यकर्ता या नात्याने मी करीत असलेल्या सामाजिक कार्याची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब व पक्ष श्रेष्ठींनी दखल घेवून माझ्यावर टाकलेल्या जबाबदारीला न्याय देण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून शिर्डीत भाविकांच्या सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देणार आहे. संस्थानचे विश्वस्त, शिर्डी ग्रामस्थ व साई भक्तांचे मार्गदर्शन घेवून शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शक कारभार करून शिर्डी संस्थांनच्या माध्यमातून श्रद्धा व विकासाची सांगड घालून शिर्डीचा विकास करू. राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे,उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष ना.जयंतरावजी पाटील, खा. सौ. सुप्रियाताई सुळे, पालकमंत्री ना.हसनजी मुश्रीफ यांच्या सहकार्याने शिर्डीत येणाऱ्या भाविकांना अपेक्षित असलेला विकास करू. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी मला पाठबळ देऊन अध्यक्षपदाच्या मिळालेल्या संधीचे सोने करून शिर्डीचे आंतरराष्ट्रीय महत्व वृद्धिंगत होण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.