साखर उद्योगासाठी केंद्राने व राज्याने साखर व इथेनॉलचे धोरणात्मक दर ठरवावे- बिपिन कोल्हे.
The Center and the state should decide the strategic rates of sugar and ethanol for the sugar industry – Bipin Kolhe.
स. म. कोल्हे साखर कारखान्याची ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा S. M. 59th Annual General Meeting of Kolhe Sugar Factory
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lFir17sep 2021, 17:50Pm.
कोपरगाव : मागील दोन वर्षापासून राज्यात व देशात उसासह साखरेचे विक्रमी उत्पादन होत आहे, त्यात मागील हंगामातील ९० लाख टन साखर गोदामात अतिरिक्त असून चालू हंगामात ३१५ लाख मेट्रिक टन साखरेचे विक्रमी उत्पादन होणार असल्याने आगामी पाच वर्षाच्या साखर उद्योग स्थैर्यासाठी केंद्र व राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन साखरेसह इथेनॉल उत्पादनास कायमस्वरूपी दर ठरवून खुल्या अर्थव्यवस्थेत सहकार टिकवण्यासाठी पावले उचलावी अशी मागणी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केली.
सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याची ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने कारखाना कार्यस्थळावर शुक्रवारी पार पडली त्यात ते बोलत होते. प्रारंभी दिवंगत झालेले मान्यवर सभासद व शेतकऱ्यांना उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी श्रद्धांजली वाहिली. माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी मागील हंगामात कारखान्याने ऐतिहासिक गाळप केल्याबद्दल सर्व सभासद, आजी माजी संचालक, कारखाना व्यवस्थापनाचे जाहीर अभिनंदन करत कौतुक केले. या प्रसंगी कारखान्याचे संचालक सर्वश्री. विवेक कोल्हे, फकीरराव बोरणारे, भास्करराव भिंगारे, ज्ञानेश्वर परजने, निवृत्ती बनकर, साहेबराव कदम, शिवाजीराव वक्ते, अरूणराव येवले, अशोकराव औताडे, सोपानराव पानगव्हाणे, संजय होन, विलास वाबळे, मनेश गाडे, संगिता राजेंद्र नरोडे, श्रीमती सोनुबाई दशरथ भाकरे, प्रदीप नवले, राजेंद्र कोळपे, मच्छिंद्र लोणारी, कामगार संचालक वेणूनाथ बोळीज, कामगार नेते मनोहर शिंदे, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, लेखापाल एस.एन. पवार, प्रवीण टेमगर, आदि उपस्थित होते. मागील सभेचे इतिवृत्त सचिव तुळशीराम कानडे यांनी वाचले. विषयपत्रिकेवरील सर्व विषय टाळ्यांच्या गजरात एक मुखाने मंजूर करण्यात आले, त्यास सभासद सर्वश्री बाळासाहेब पानगव्हाणे, रमेश घोडेराव, लहानु मेमाने, नानासाहेब थोरात, नानासाहेब गवळी, यादवराव संवत्सरकर, बाळासाहेब निकोले, सतीश आव्हाड, शरद थोरात, जयराम सांगळे, ज्ञानेश्वर होन, सोपानराव कासार, रमेश औताडे, प्रकाश बारहाते, रामचंद्र कासार, माधवराव रांधवणे, नानासाहेब होन, अशोक शिंदे, बबनराव निकम, प्रकाश भाकरे, अंबादास पाटोळे, सुभाष शिंदे, विलास माळी, मच्छिंद्र भुसे, ,विश्वास गाडे, शरद गडाख यांनी सूचनांसह अनुमोदन दिले. दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावात रुग्णांना दिलासा देऊन त्यांच्यासाठी ५०० खाटांचे रुग्णालय उभारून मोफत उपचार केल्याबद्दल जिल्हा बँकेचे संचालक व संजीवनी युवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष विवेक कोल्हे यांचा ऐनवेळच्या विषयात भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहम,माजी उपाध्यक्ष बाळासाहेब वक्ते, दिलीप बनकर आदींनी सत्कार केला.
बिपिन कोल्हे पुढे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या साईबाबा संस्थान अध्यक्षपदी आमदार आशुतोष काळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देत मागील विश्वस्त मंडळाने निळवंडे शिर्डी व कोपरगाव या पिण्याच्या पाणी योजनेस मंजुरी देऊन आर्थिक तरतूद केली असून ती नवनिर्वाचित अध्यक्षांनी पूर्ण करावी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकाराचे बळकटीकरण करण्यासाठी नव्याने अमित शहा यांची सहकार मंत्री म्हणून नियुक्ती करत साखरेसह इथेनॉल बाबत त्याच्च्यासह केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, पेट्रोलियममंत्री हारदीप सिंग पुरी यांनी धोरणात्मक निर्णय घेत डॉलरच्या तुलनेत रुपया सुधारून आत्मनिर्भर भारत देशाचे स्वप्न साकारण्यासाठी पाठबळ देत कोरोना आपत्तीत अन्य उद्योग व्यवसाय सह, साखर उद्योगासाठी १५ हजार कोटी आर्थिक सहाय्य घोषणा करत, विद्युत सह सोलर वाहने उत्पादनासाठी धोरणात्मक पावले उचलली ही बाब निश्चितच स्वागतार्ह आहे. शेतकऱ्यांच्या शेतीला पाण्याच्या समृद्धीसाठी नदीजोड प्रकल्पाला चालना दिली आहे.
जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरासिटामॉल औषधी प्रकल्प उभारणी सुरू करून दर्जेदार रासायनिक उपपदार्थ निर्मितीवर भर देऊन आगामी सात वर्षात राज्यातील पहिल्या दहा सहकारी साखर कारखान्यात संजीवनी कोल्हे कारखान्याचे नाव अग्रभागी राहण्यासाठी त्यांच्यासह संचालक सभासद, शेतकरी प्रयत्न करत आहे. चालू गळीत हंगामात संजीवनीने सव्वा आठ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवून दोन कोटी युनिट सहवीज निर्मितीवर भर देणार आहे. कार्यक्षेत्रात उसाचे उत्पादन वाढावे यासाठी ८६०३२, एम एस १०००१, कोसी ६७१ या नवीन संशोधित वानाच्या लागवडीस प्राधान्य देत आहे त्यास सभासद शेतकऱ्यांनी साथ द्यावी. कारखाना अंतर्गत रस्ते दुरुस्तीसाठी केंद्र व राज्य शासनाने मदत करावी असे ते म्हणाले. शेवटी उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी आभार मानले.
चौकट
योगायोग :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस व कारखान्याची ५९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा हा दुग्धशर्करा योग असून सर्व सभासदांच्या वतीने बिपिनदादा कोल्हे यांनी त्यांचे अभिनंदन करणारा ठराव यावेळी मांडला.