मोदींच्या वाढदिवशी बेरोजगार दिन, मग थोरातांच्या वाढदिवशी काय गोहत्या दिन का ? – वहाडणे
Unemployment day on Modi’s birthday, then why cow slaughter day on Thorat’s birthday? – Wahadane
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lFir17sep 2021, 14:50Pm.
कोपरगाव : भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी बेरोजगार दिन साजरा करण्याचा पोरकटपणा युवक काँग्रेस करणार असल्याचे सत्यजित तांबे यांनी जाहिर केले यावरूनच नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी तांबे यांना शुक्रवारी चांगलेच फटकारले.
वहाडणे पुढे म्हणाले, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात प्रत्येक वाढदिवस हा आनंदाचा दिवस असतो.भ्रष्टाचाराचा एकही डाग नसणाऱ्या नरेंद्र मोदींवरही टिका करायला,आंदोलन करायला हरकत नाही.पंतप्रधान झाल्यापासून विरोधक त्यांच्यावर पातळी सोडून टिका करतच आहेत.पण सत्यजित तांबे यांनी जरा तरी भान ठेवायला हवे.असे कुणीही उठून एका आदर्श व्यक्तीच्या वाढदिवसाला असा आचरटपणा करायला लागले तर, यानंतर कुणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त “गोहत्या दिन” साजरा करू शकतात. गोहत्येला कायद्याने बंदी असतांना कॅबिनेट मंत्र्यांच्या संगमनेरमध्ये वर्षानुवर्षे सर्रासपणे रात्रंदिवस हजारो गायींची हत्या होत आहे. म्हणून तुमच्या नेत्यांचा वाढदिवस गोहत्या दिन म्हणून साजरा केला तर तुम्हाला कसे वाटेल याचा विचार करा. माझे म्हणणे चुकीचे आहे असे तुम्हाला मनापासून वाटत असेल तर तसे जाहिर करा.पंतप्रधान मोदींविरुद्ध असे काही केल्याने तुम्हाला बढती मिळणार असेल तर माझा काहीच आक्षेप नाही.