शेतकऱ्यांना खरीपाची पाणीपट्टी आकारू नये आ. काळे यांची जलमंत्र्याकडे मागणी
Farmers should not be charged kharif water. Kale’s demand to the water minister
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lFir17sep 2021, 14:00Pm.
कोपरगाव : मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना आवर्तनाची आवश्यकता भासणार नाही तेव्हा पाटबंधारे विभागाने पाणी मागणी केलेल्या शेतकऱ्यांना पाणीपट्टी आकारू नये अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी जलसंपदामंत्री ना.जयंतराव पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आ.काळे यांनी असे म्हटले आहे की, खरीपाचा हंगाम घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पिके उभी केली मात्र पाऊस गायब झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे सात नंबर पाणी मागणी अर्ज दखल करून पाण्याची मागणी केली होती. परंतु मागील काही दिवसांमध्ये दमदार पाऊस झाल्यामुळे परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीपासाठी पाण्याची आवश्यकता भासणार नाही अशी परिस्थिती आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांची बहुतांशी पिके काही दिवसांनी काढणीला येणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडून पाणीपट्टी शुल्क आकारू नये असे निवेदनात म्हटले आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. या धरणांमधून आजही हजारो क्युसेसने पाणी खाली जायकवाडी धरणामध्ये वाहून जात आहे. मात्र गोदावरी कालव्याच्या आवर्तनावर अवलंबून असणाऱ्या अनेक पाणी पुरवठा योजनांच्या साठवण तलाव व बंधाऱ्यामध्ये थोडाच पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे काही दिवसांनी पाणी टंचाई जाणवू शकते. त्यासाठी गोदावरी कालव्यांना सोडण्यात आलेल्या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून कोपरगाव विधानसभा मतदार संघातील सर्वच पाणी योजनांचे गावतलाव व साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून द्यावे अशी मागणी ना.जयंतराव पाटील यांच्याकडे केली आहे.





