नव्या पंचायत समिती कार्यालयासाठी १ कोटी ६७ लाखाचे फर्निचर – आ.आशुतोष काळे
1 crore 67 lakh furniture for new Panchayat Samiti office – MLA Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lSat18sep 2021, 19:00Pm.
कोपरगाव : कोपरगाव पंचायत समितीच्या नव्या कार्यालयाच्या फर्निचरसाठी आमदार आशुतोष काळे यांनी ग्रामविकास खात्याकडून १ कोटी ६६ लाख ९९ हजार रुपयांचा निधी मंजूर करून आणला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
माजी आमदार अशोकराव काळे यांनी विरोधी पक्षाचा आमदार असतानाही त्यांच्या कार्यकाळात शहरातील शोभा वाढविणाऱ्या अनेक शासकीय इमारतींची कामे मार्गी लावली आहेत. या शासकीय इमारतींनी कोपरगाव शहराची शोभा वाढविली. याच अनुषंगाने ग्रामीण भागातील लोकांचे लोकांसाठी पंचायत समितीच्या प्रशस्त इमारतीचे काम पूर्णत्वाकडे आहे या इमारतीमध्ये अद्यावत फर्निचर असावे यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठवून या प्रस्तावांचा ग्रामविकास खात्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे फर्निचर साठी एक कोटी ६७ लाखाचा निधी मंजूर झाला आहे. याबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजित पवार, ग्रामविकासमंत्री ना.हसन मुश्रीफ यांचे आभार मानले आहे. लवकरच पंचायत समितीचे सर्व सोयी सुविधा व अद्यावत फर्निचर असलेले कार्यालय लवकरच कोपरगाव करांचा सेवेत रुजू होणार आहे तर कोरोना संकटातही आपण निधी मिळवला आहे, यापुढेही मतदार संघासाठी जास्तीत जास्त निधी मिळविण्याचा आपला प्रयत्न असल्याचे आ काळे यांनी सांगितले.





