आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेचा तुटवडा व दर पाहता केंद्र सरकारने ७० लाख मे. टन निर्यातीस परवानगी द्यावी-आ. आशुतोष काळे
Considering the shortage and price of sugar in the international market, the central government has given Rs.70 Lakh Tons of exports should be allowed. Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lSat18sep 2021, 19:20Pm.
कोपरगाव : दुष्काळ व वातावरणातील बदलामुळे ब्राझील व थायलंडमध्ये साखर उत्पादन घटणार असुन परिणामतः आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ४० ते ५० लाख टन साखरेचा तुटवडा भासणार असून साखरेचे दर आज ३२०० रूपये आहेत अशा परिस्थितीत भारतीय साखरेला चांगली मागणी असणार आहे २०२१-२२ चा गाळप हंगाम आशादायी आहे. त्यामुळे केंद्र सरकारने साखर दराची स्थिरता पाहून वेळेतच ७० लाख मेट्रिक टन साखरेच्या निर्यातीस परवानगी द्यावी अशी कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या ६८ व्या ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने आ. आशुतोष काळे सभेत त्यांच्या वतीने बोलताना जनरल मॅनेजर सुनील कोल्हे त्यांनी ही मागणी मांडली .
अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संचालक माजी आमदार अशोक काळे होते. अध्यक्षीय पदाची सूचना दिलीप शिंदे यांनी मांडली धर्मा दहे यांनी अनुमोदन दिले. जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, पुढे म्हणाले कर्मवीर काळे कारखान्याने २०२०-२१ च्या हंगामात ६,८८,७८४ मे.टन ऊसाचे गाळप करून ७,२९,८०० क्विंटल साखर उत्पादन झाले असून १०.६०% सरासरी साखर उतारा मिळाला आहे. कारखान्याने सन २०२०-२१ हंगामाची एफ.आर.पी. प्रति मे.टन रुपये २३५५.१५ असतांना त्यापेक्षा १४४.८५ ज्यादा दर देऊन प्रति मे.टन रुपये २५००/- प्रमाणे ऊस दर दिला आहे. २०२०-२१ च्या गळीत हंगामात राज्यात ९५ सहकारी व ९५ खाजगी असे एकूण १९० साखर कारखान्यांनी १०१४.३० लाख मे.टन ऊसाचे गाळप करून १०६.६६ लाख मे. टन साखरेचे उत्पादन घेतले साखर उतारा १०.५२ % इतका होता. कृषी व मूल्य आयोगाने ऊसाची एफ.आर.पी. रक्कम (ऊसाचा किफायतशीर दर) हि हफ्ते पाडून देण्याची शिफारस केली असली तरी कर्मवीर शंकरराव काळे व माजी आमदार अशोक काळे यांची शेतकरी हिताची जिल्ह्यात सर्वाधिक ऊस दर देण्याची परंपरा यापुढेही सुरु राहणार आहे. ऊस उत्पादकानी निश्चिंत राहावे. असे आश्वासन चेअरमन आ. काळे यांच्या वतीने त्यांनी दिले. अधिक माहिती देताना जनरल मॅनेजर सुनील कोल्हे म्हणाले केंद्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण व वितरण मंत्रालयाने ऊसाचे एफ.आर.पी. मध्ये रुपये ५०/- ची वाढ करून १० टक्के रिकव्हरी करिता रु.२९००/- प्रति मे.टन इतकी करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. मागील अडीच वर्षापासुन साखरेचे किमान विक्री मूल्य (MSP) प्रतिकिलो रु.३१/- असून ते किमान रु.३४/- ते रु.३५/- प्रतिकिलो वाढविण्याची गरज आहे. येत्या हंगामात देशामध्ये ३१० लाख मे.टन साखरेचे उत्पन्न होईल असा ‘इस्मा’ (ISMA) अंदाज असून पुढील हंगामातील ७० लाख मे.टन निर्यातीचा निर्णय केंद्र शासनाने वेळेत घ्यावा अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी चेअरमन आ.आशुतोष काळे यांच्या वतीने स्पष्ट केले. सभेत ऑनलाईन पद्धतीने सहभागी झालेल्या सभासदांनी विषय पत्रिकेवरील १ ते १३ विषय रीतसर सूचना व अनुमोदन आल्यानंतर मंजूर करण्यात आले. श्रद्धांजलीचा ठराव व्हा.चेअरमन सुधाकर रोहोम यांनी मांडला. संचालक ज्ञानदेव मांजरे यांनी कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांची साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला त्यावेळी सर्व संचालक मंडळ व ऑनलाईन पद्धतीने सहभागी झालेल्या सभासदांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. आभार संचालक अरुण चंद्रे यांनी मानले व सूत्रसंचालन सेक्रेटरी बाबा सय्यद यांनी केले. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या सुचनेनुसार कारखान्याच्या सभासदांना सभेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने





