गोदावरी कालवा लाभक्षेत्रातील गावतळी, बंधारे ओव्हरफ्लोच्या पाण्याने भरून द्यावे-स्नेहलता कोल्हे.

गोदावरी कालवा लाभक्षेत्रातील गावतळी, बंधारे ओव्हरफ्लोच्या पाण्याने भरून द्यावे-स्नेहलता कोल्हे.

Villages, dams in Godavari canal catchment area should be filled with overflow water-Snehalta Kolhe.

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lSat18sep 2021, 19:40Pm.

कोपरगाव :दारणा गंगापूर धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून ओव्हरफ्लोचे पाणी गोदावरी नदीला सोडले जात आहे, तेव्हा कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील गोदावरी कालवा लाभक्षेत्रातील गावतळी, दगडी साठवण बंधारे, या पाण्याने भरून द्यावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी पाटबंधारे खात्याकडे केली आहे.

   सौ. स्नेहलता कोल्हे यांनी नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व उत्तर महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता तसेच जिल्हाधिकारी अहमदनगर यांना लिहिलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, गोदावरी डाव्या आणि उजव्या कालवा लाभक्षेत्रात  चालू वर्षी पाऊस उशिराने पडत आहे अजूनही भूगर्भातील  पाण्याची पातळी वाढलेली नाही, तेव्हा ओव्हरफ्लोच्यi पाण्याने गावतळे, साठवण बंधारे, दगडी साठवण बंधारे भरून द्यावे अशी असंख्य शेतकऱ्यांनी आपल्याकडे मागणी केली आहे.   भूगर्भातील पाणी वाढले तर त्याचा फायदा जनावरांसह नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी होणार आहे.  तेव्हा नाशिक पाटबंधारे विभागाने तात्काळ गोदावरी उजव्या आणि डाव्या कालव्यात लाभक्षेत्रातील गावतळी साठवण बंधारे दगडी साठवण बंधारे पाण्याने भरून द्यावे असे सौ स्नेहलता कोल्हे  शेवटी म्हणाल्या.

Leave a Reply

You cannot copy content of this page