तहसीलदार योगेश चंद्रे यांनी मानले कोपरगावकरांचे आभार, व्यक्त केलेल्या भावना
Tehsildar Yogesh Chandre expressed his gratitude to Kopargaonkar
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lSun19sep 2021, 09:20Am.
कोपरगाव : येथील लोकप्रिय ठरलेले तहसीलदार योगेश चंद्रे यांची जिल्ह्यातील जामखेड येथे तहसीलदारपदी बदली करण्यात झाली आहे.
माझे पद मोठे असले तरी गरीब कुटुबांत जन्मलो असल्यामुळे ग्रामीण भागातील समस्यांची जाणीव होती आणि त्या खऱ्या अर्थाने सोडविण्यास मदत झाली. काम करत असताना सामान्य जनतेच्या कामाना प्राधान्य देऊन जेवढे शक्य होईल तेवढे काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तालुक्यातील सर्वच लोकांनी खुप खुप साथ देऊन माझेवर व माझ्या संपुर्ण कुटुंबावर भरभरुन प्रेम केले.त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासुन खुप खुप आभार!
मी तहसिलदार योगेश विठ्ठलराव चंद्रे माझी फेब्रुवारी २०१९ मध्ये तळोदा (नंदुरबार) येथुन बदली होऊन मी कोपरगाव येथे हजर झालो. कोपरगाव तालुका हा माझा शैक्षणिक तालुका असल्याकारणाने मला ओळखणारे तालुक्यात खुप माणसे होती.पण मनाचा निश्चय होता की आपल्या कार्यकाळात गोरगरीब जनतेची, अडलेल्या-नडलेल्या लोकांची कामे झालीच पाहीजे. ते स्वप्ने मनात ठेऊन नियमात बसणारी कामे मी पहील्या दिवसापासुनच सुरु केली..ही सर्व कामे करतानी मला तालुकावासियांकडुन खुप काही शिकायला मिळाले. गोरगरीबांची,अडले-नडलेल्या लोकांची कामे झाल्यानंतर त्यांच्या चेह-यावरील समाधान पाहुन मला जो आनंद व्हायचा त्यातुन मला पुढील कामे करण्यासाठी खुप खुप पाठबळ व शक्ती मिळायची.त्यातुन मी प्रामाणिकपणे काम करुन न्याय देण्याचा प्रयत्न केला. काही कामे राहुन गेले असतील त्याची सल मला कायमच राहील. परंतु मी नसल्यावर ती कामे होणार नाही असे नाही. माझ्या बदलीनंतर अजुन चांगले अधिकारी येतील ते सुध्दा आपली कामे मार्गी लावतील यात शंका नाही. मी प्रामाणिकपणे काम करत असताना काही लोकांची कामे झाले नसतील त्यातुन काही नागरीक नाराज झाले असतील. परंतु जास्तीत जास्त सर्वसामान्य नागरीकांची कामे मी अन्याय न करता लवकरात लवकर करुन दिली…त्याचा मला अभिमान आहे. विशेष म्हणजे लोकसभा विधानसभा निवडणुका ,कोरोनाचे संकट असो, अतिवृष्टी, महापूर असो अथवा साथीचे थैमान असो की तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न असो ही सर्व कामे करतानी आपली सर्वांची भक्कम साथ,पाठबळ व आशिर्वाद माझ्या पाठीशी असल्यामुळेच मी हे सर्व काही करु शकलो. कोरोनाकाळात माझ्या नावाचा उदो-उदो केला परंतु ह्या काळात तालुक्यातील सर्वच लोकांनी अगदी मनापासुन खुप मोलाची साथ दिल्यामुळेच कोरोना आटोक्यात ठेवु शकलो…माझ्या उदो-उदो पेक्षा हे सर्व श्रेय आपल्या सर्व नागरीकांचे आहे.
मी माणुस आहे नोकरी काळात माझ्याकडून काही चुका झाल्या असतील,काही लोक दुखावले गेले असतील पण त्यांनी सुध्दा माझ्यावर खुप भरभरुन प्रेम केले व भक्कम साथ दिली.कार्यालयातील असलेला स्टाफ या सर्वांनी मला कामात खुप मोलाची साथ दिल्यामुळेच मी आपली सर्व कामे यशस्वी करु शकलो, कामात व विकासात ज्यांचा महत्वाचा वाटा असतो असे माझे पत्रकारबांधव , सामाजिक कार्यकर्ते,विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांनी सुध्दा माझ्या कार्यकाळात खुप मोलाची साथ दिली,
त्यांचेमुळेच मला लोकांच्या अडीअडचणी कळाल्या. म्हणुनच मी त्या सर्व लोकांची कामे लवकर करु शकलो.आमदार आशुतोष काळे, माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे, बिपीन कोल्हे, नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, राजेश परजणे तसेच आजी-माजी सर्व जि.प.सदस्य, पं.स.सदस्य,नगरसेवक,तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी,अधिकारी व स्टाफ तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच,उपसरपंच,सर्व सद्स्य, ग्रामस्थ,पोलीस पाटील, तालुक्याच्या विविध राजकिय पक्षांचे तालुकाअध्यक्ष, शहरअध्यक्ष,विविध पदावर असलेले मान्यवर ह्या वडीलधारी लोकांचे खुप मोलाचे मार्गदर्शन व मोलाची साथ मिळाल्यामुळे मी माझ्या कार्यकाळात खुप खुप कामे सहजतेने करु शकलो.
विशेषतः तालुक्यातील ग्रामिण व शहरी पोलीस स्टेशनचे अधिकारी व स्टाफ,आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी व स्टाफ,कृषी विभागाचे सर्व अधिकारी व स्टाफ,नगरपालिकेचे सर्व अधिकारी व स्टाफ,पंचायत समितीचे सर्व अधिकारी व स्टाफ,फाॕरेस्ट विभागाचे सर्व अधिकारी व स्टाफ,कोपरगाव तालुक्यातील सर्व नामांकित डाॕक्टर्स तसेच आमचे फिल्डवरील सर्व तलाठी,मंडळ अधिकारी,ग्रामसेवक,कृषी सहाय्यक कोतवाल,रेशन दुकानदार ह्या सर्वांनी तालुक्याच्या अडचणीच्या काळात माझ्या कामात खुप मोलाची साथ दिली त्यांचे काम मी कधीच विसरु शकत नाही. कोपरगाव कोर्ट मधील अधिकारी ,सर्व स्टाफ व सर्व वडीलधारी अॕडव्होकेट यांनी सुध्दा माझ्या कार्यकाळात कामात खुप खुप साथ दिली.ह्या सर्व प्रवासात मला खुप ज्ञात-अज्ञात मान्यवरांनी मोलाची साथ दिली आहे. चुकुन कोणाचे आभार मानायचे विसरलो तर माफ करावे….परंतु तालुक्यात अशी व्यक्तीच नाही की त्यांनी माझ्या कामात साथ दिली नाही. त्यांचे काम मी कधीच विसरु शकत नाही. ह्या सर्वांचे व सर्व कोपरगावकरचे खुप आभारी आहे.असेच प्रेम , साथ व आशिर्वाद नविन येणा-या अधिका-यांप्रती असु द्या. अशी अपेक्षा तहसीलदार योगेश चंद्रे यांनी शेवटी कोपरगावकरांकडे व्यक्त केल्या,