वाहन चालक दिनानिमित्त रिक्षा ,टॅक्सी,बस व ट्रक चालकांचा पोलीसांकडून सत्कार

वाहन चालक दिनानिमित्त रिक्षा ,टॅक्सी,बस व ट्रक चालकांचा पोलीसांकडून सत्कार

Police felicitate rickshaw, taxi, bus and truck drivers on the occasion of Driver’s Day

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lSun19sep 2021, 17:30Pm.

कोपरगाव : कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी शुक्रवारी चालक दिनाचे औचित्य साधत ठिकठिकाणी असलेल्या रिक्षा व टॅक्सी थांब्यांना भेट देऊन तेथील चालकांचा तसेच एसटी स्टँड येथे बस चालक व साई कॉर्नर येथे रोडवरील ट्रक चालक व शहरातील ट्रक चालक यांचा गुलाब पुष्प व मिठाई देऊन सत्कार केला.

यावेळी शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी या सर्वच चालकांचा सत्कार केल्यानंतर ते करीत असलेल्या प्रवासी सेवेचे व त्यांच्या प्रामाणिकपणाचे कामाचे कौतुक केले यावेळी त्यांना महिला प्रवासी सुरक्षा संदर्भात तसेच रस्त्यावरील वाहतुकीसंदर्भात मार्गदर्शन केले. शहर पोलीस स्टेशनच्या पोलिस गाडीवरील चालक Asi साठे यांचा शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करून चालक दिवस साजरा केला. वाहन चालक पोलीस यांचे नाते नेहमीच संघर्षाचे राहिली आहे त्यामुळे पहिल्यांदाच चालक दिनानिमित्त पोलिसांकडून होणारे या सत्काराने सर्व स्तरातील वाहनचालक भारावून गेले होते. पोलीस निरिक्षक वासुदेव देसले यांनी रिक्षा टॅक्सी चालकांच्या केलेल्या सहकार्याबद्दल कोपरगाव तालुका आटो रिक्षा संघटनेचे अध्यक्ष कैलास जाधव व उपाध्यक्ष राजेंद्र सालकर आभार व्यक्त करून व्यक्त केले.

यावेळी उपाध्यक्ष राजेंद्र सालकर म्हणाले, व्यावसायिक स्तरावर वाहनचालक व पोलीस यांचे नाते नेहमी वादग्रस्त व संघर्षाचे असते वाहन चालक दिनानिमित्त आज केलेल्या सत्कारामुळे परस्परातील  अविश्वासाची दरी कमी होऊन दोघांमध्ये  एक विश्वास व आपलेपणा निर्माण होईल, याचा परिणाम निश्चितच महिला असो की ज्येष्ठ प्रवासी त्यांच्या सुरक्षेवर होणारा आहे. कोपरगाव शहरातील आमच्या रिक्षा संघटनेच्या  रिक्षाचालकांनी आजपर्यंत  नेहमी पोलिसांना विश्वासाने मदत केली आहे ती यापुढेही सुरू राहील असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

You cannot copy content of this page