Ganesh Visarjan : कोपरगावात गणपती विसर्जनासाठी यंदा पालिकेची विसर्जन रथ (Immersion chariot )व्यवस्था

Ganesh Visarjan : कोपरगावात गणपती विसर्जनासाठी यंदा पालिकेची विसर्जन रथ (Immersion chariot )व्यवस्था

Ganesh Visarjan: Immersion chariot arrangement for immersion of Ganpati in Kopargaon this year

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lSun19sep 2021, 18:30Pm.

कोपरगाव :कोपरगाव (Kopargaon) शहरात गणेश मूर्ती विसर्जनासाठी (Ganesh Visarjan) मुख्याधिकारी शांताराम गोसावी व पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव नगरपालिका प्रशासनाने सात ठिकाणी विसर्जन रथ (Immersion chariot)व्यवस्था  असुन अनंत चतुर्थी रविवारी (ता.१९) येथे घरोघरी स्थापन करण्यात आलेल्या गणेश मूर्तीचे विसर्जन केले जात आहे. ना बँड, ना ताशा, ना मिरवणूक, ना जयघोष शांतपणे केले जातेय गणपती विसर्जन.

संध्याकाळी ६ वाजता सर्व गणेशमूर्तींचे गोदावरी नदीच्या मोठ्या पुलाखाली सर्व प्रशासनाने हजर राहून भक्तिभावाने विसर्जन केले.

कोपरगाव नगरपालिकेने बाप्पाच्या विसर्जनासाठी शहरात सात ठिकाणी विसर्जन रथ उभे केले होते. सर्व रथ नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी यांनी शहर हे आपले एक मंडळ आहे अशा पद्धतीने सजविले होते. कोरोनाविषयक कोणतेही नियम न मोडता नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी यांनी नागरिकांना कोणतीच गैरसोय होऊ नये याकरिता दिवसभर मुर्त्यांचे संकलन केले. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा समतोल राखण्यासाठी पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गर्शनाखाली याप्रत्येक टीम सोबत दोन पोलिस अधिकारी कर्मचारी पोलिस प्रशासाने दिले होते.

संध्याकाळी ६ वाजता सर्व गणेशमूर्तींचे गोदावरी नदीच्या मोठ्या पुलाखाली सर्व प्रशासनाने हजर राहून भक्तिभावाने विसर्जन केले. हे सर्व नियोजन पाहून शहरातील नागरिक भावूक झालेले दिसले. शहरातील नागरिकांनी या ठिकठिकाणी असणाऱ्या पथकाचे कौतुक करून सत्कार करण्यात केला.
नगराध्यक्ष विजय वहाडणे, उपनगराध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांनी मुख्याधिकारी तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले. स्वतः नगराध्यक्षांनी शहरातील सर्व गणेश विसर्जन ठिकाणांची पाहणी करून अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुनियोजित काम करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले व केलेले काम शहर कधीच विसरणार नाही, अशा शब्दात कौतुक केले.
पर्यावरणाची हानी होऊ नये या अनुषंगाने नगरपरिषद प्रशासनाने गोदावरी नदीमध्ये मूर्ती विसर्जन करणे तसेच नदीमध्ये निर्माल्य टाकणे ही प्रथा कमी करून गोदावरी नदीचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केला. या कार्यास गोदामाई प्रतिष्ठान, के जे सोमय्या महाविद्यालय, लायन्स क्लब यांनी देखील सहकार्य केले.
चौकट
शहरातील सर्व गणेशाचे विसर्जन झाल्यानंतर “एक गाव एक गणपती” श्री गणेशाचे विसर्जन थाटामाटात उत्साहाच्या वातावरणात पालिका प्रशासन, पोलीस प्रशासन सर्व नागरिक, सर्व पदाधिकारी यांच्यावतीने सायंकाळी मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आले .

Leave a Reply

You cannot copy content of this page