भाजप सेना आणि वहाडणे एकत्र, राष्ट्रवादीची नरमाई ! जनतेची कड की आर्थिक नड तर्क-वितर्क व चर्चा

भाजप सेना आणि वहाडणे एकत्र, राष्ट्रवादीची नरमाई ! जनतेची कड की आर्थिक नड तर्क-वितर्क व चर्चा

BJP Sena and Vahadane together, softening of NCP! Arguments and discussions on the economic side of the people

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lTue21sep 2021, 18:30Pm.

कोपरगाव : गेल्या काही दिवसापासून कोपरगाव शहरात गाजत असलेल्या २८ कामांच्या मुद्द्यावरून आमची दिलजमाई झाली म्हणत आज मंगळवारी (२१) रोजी भाजप-सेना आणि वहाडणे यांनी एकत्र येऊन पत्रकार परिषद घेतली आहे. त्यात उभयतांनी लवकरच त्या २८ कामांना सुरुवात होणार असल्याचे जाहीर केल्याने महत्त्वाच्या घडामोडींना वेग आला आहे.

विद्यमान पालिका सभागृह आला काही महिन्यांचा अवधी शिल्लक असल्याने या नव्या सहमती एक्सप्रेस वरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे. गेली चार वर्ष सातत्याने कोल्हेंच्या विरोधात टोकाची भूमिका घेणाऱ्या वहाडणे यांनी आपण गेल्या दीड महिन्यापासून सोशल मीडियावरील टीकाटिपणी ला पायबंद घातला आहेअसे सागितले. आज आपण एकत्र बसलो हे पाहून मला समाधान आहे की, आपण सगळेच जण राजकारण बाजूला ठेऊन जनतेच्या हिताच्या गोष्टी आपण करत आहोत. आपणही तसेच वागत राहिलो,तर आता जनतेचा नेत्यावरील विश्वास उडाल्याशिवाय राहणार नाही , असे वक्तव्य नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आपल्या भाषणात केले. मी आठ दिवसांपूर्वी केलेल्या स्थगिती मागे घ्यावी या आवाहनांवर भाजपसेना संबंधितांनी सकारात्मक दृष्टीकोण घेतल्याने लवकरच या कामांना सुरुवात होईल या विधानावरून राजकीय वर्तुळात एकत्र येण्याच्या शक्याशक्यतेवर चर्चा सुरू झाली आहे. दोघे एकत्र आल्याचे आज दिसत आहे. यावरून राजकारणात कधीही काही होऊ शकतं. त्यांना शुभेच्छा आहेत. कोपरगावचे नुकसान होतंय. म्हणून त्यांनी मनातील भावना बोलून दाखविली. शहर विकास व जनतेच्या नावाखाली हे गठबंधन चालू आहे. ते फार काही टीकू शकणार नाही. पालिकेत भाजप सेना सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत आहेत. लोकांनी कररूपाने दिलेल्या पैशाचा अपव्यय होऊ नये यासाठी या २८ कामांच्या विरोधाचे प्रकरण थेट उच्च न्यायालयापर्यंत गेलं करत आहोत. माननीय नगराध्यक्षांच्या लक्षात आलं की ते कशाप्रकारच्या लोकांसोबत काम करताएत. हे त्यांना समजलं, त्यामुळे त्यांनी दोन पावले मागे सरकत समझोत्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे ते दोघे एकत्र आले यावरून तर्क करणं योग्य नाही यावर भाजप सेना नगरसेवकांना वहाडणे यांना दिलेला शब्द पाळा असे आवाहन करणाऱ्या राष्ट्रवादीने कुरघोड्यांचं राजकारण करू नये, आम्ही पहिल्यापासूनच वहाडणेसोबतच आहोत, हा संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न असावा. सातत्याने एकमेकांवर खालच्या स्तरावर जाऊन आरोप-प्रत्यारोप करणारे अचानक नगरपालिकांच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्यानंतर सर्वजण नरमाईच्या भूमिकेत आल्याने नागरिकातून आश्चर्य व्यक्त होत आहे. एवढे सगळे झाल्यानंतर ही २८ विकासकामे येत्या दोन-तीन महिन्यात तेही दर्जेदार होणार आहेत का ? याबाबत मात्र प्रश्नचिन्ह आहे. कोणी म्हणतं यातील काही कामे अर्धवट झालेली आहे, काहींच्या वर्कऑर्डर दिलेल्या आहेत, त्यामुळे आता फक्त तांत्रिक सोपस्कर पूर्ण करावयाचे असल्याचे बोलले जात आहे .भाजप सेना आणि वहाडणे एकत्र, राष्ट्रवादीची नरमाई ! जनतेची कड की आर्थिक नड ,  तर्क-वितर्क व चर्चांना उधाण आले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page