माहेगाव देशमुख ग्रामपंचायत, उपसरपंच काळे गटाचे विकास रणसिंग
Mahegaon Deshmukh Gram Panchayat, Deputy Panch Development of Kale Group Ransing
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lThu23sep 2021, 17:50Pm.
कोपरगाव : तालुक्यातील माहेगाव देशमुख ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काळे गटाचे विकास दत्तात्रय रणशिंग यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
माहेगाव देशमुख ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच बाळासाहेब विश्वनाथ पानगव्हाणे यांनी रोटेशन पद्धतीनुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त असलेल्या उपसरपंचपदी काळे गटाचे विकास दत्तात्रय रणशिंग यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
विकास रणशिंग म्हणाले की, आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली माहेगाव देशमुख ग्रामस्थांचे विकासाचे प्रश्न सोडवून मिळालेल्या संधीचे सोने करणार असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक गोरक्षनाथ शेळके यांनी काम पाहिले. याप्रसंगी सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे, मावळते उपसरपंच बाळासाहेब पानगव्हाणे, सदस्य भाऊसाहेब लांडगे, मच्छिंद्र जाधव, भीमराज रोकडे, सौ. कमल संभाजी काळे, सौ. प्रमिला दत्तात्रय काळे, सौ. वैशाली भागवत पानगव्हाणे, सौ. रुपाली शशिकांत पानगव्हाणे, सौ. लहानबाई मच्छिंद्र गावित्रे, सौ. बेबी अरुण गोंधळे आदी मान्यवर उपस्थित होते. नवनिर्वाचित उपसरपंच विकास रणशिंग यांना माजी आमदार अशोकराव काळे, आमदार आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
चौकट :- राजकारणात दिलेला शब्द पाळणारे ‘काळे कुटुंब’ असून मी काळे कुटुंबाचा कार्यकर्ता असल्याचा मला आभिमान आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केले ते काम प्रगतीपथावर आहे याचे मोठे समाधान मिळत आहे. – मावळते उपसरपंच बाळासाहेब पानगव्हाणे





