मराठा क्रांती मोर्चाने महापुरुषांच्या कमानी बांधण्यासाठी पालिकेकडे मागितली परवानगी

मराठा क्रांती मोर्चाने महापुरुषांच्या कमानी बांधण्यासाठी पालिकेकडे मागितली परवानगी

Maratha Kranti Morcha sought permission from the municipality to build arches of great men

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir24sep 2021, 18:40Pm.

 कोपरगाव : मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाजाच्या वतीने विघ्नहर चौक येथे छ. शिवाजी महाराज प्रवेशद्वार, गांधी चौक येथे राष्ट्रमाता जिजाऊ मांसाहेब प्रवेशद्वार, धारणगाव रोडवर छ. संभाजी महाराज प्रवेशद्वार, व हेडगेवार चौक बस स्टँड समोर नरवीर बाजीप्रभू देशपांडे या महापुरुषांच्या कमानी बांधण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी नगरपालिका मुख्याधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे शुक्रवारी करण्यात आली आहे.

या निवेदनावर भरत मोरे, अनिल गायकवाड, विनय भगत, अमित आढाव, निखिल डांगे, गणेश जाधव, विक्रांत झावरे आदींच्या सह्या आहेत.

या निवेदनामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकानजीकच्या कुठल्याही प्रकारची तांत्रिक मंजुरी नसताना मेनरोडवर अतिक्रमण करून भव्य अशा आर. सी. सी. कमानीचे बांधकाम करण्यात येत आहे. या आरसीसी कमानीच्या बाबत नगरपालिकेकडे माहितीच्या अधिकारात सदर कमानीची तांत्रिक मंजुरी, कार्यारंभ आदेश,व अंदाजपत्रक मिळावे अशी विचारणा केली असता संबंधित विभागाने याबाबत आपण मागितलेली माहिती या विभागाकडे उपलब्ध नाही त्यामुळे माहिती पुरवता येत नाही असे स्पष्ट लेखी दिले आहे. याचा अर्थ कुठल्याही प्रकारची तांत्रिक मंजुरी नसताना ईतक्या घाईने बांधकाम करण्याची घाई का.? असा सवाल  सकल मराठा समाजाच्या वतीने शिवसेनेचे माजी शहरप्रमुख भरत मोरे यांनी एका पत्रकाद्वारे विचारला आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page