साथीचे आजार रोखण्यासंबधी आ. काळे यांच्या प्रशासनाला ऑनलाइन सूचना
About the prevention of epidemics. Online notice to Kale’s administration
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lSat25sep 2021, 18:30Pm.
कोपरगाव : मतदार संघातील काही गावात डेंग्यू सदृश्य बाधित रुग्ण आढळल्याची माहिती समजल्यानंतर आमदार आशुतोष काळे यांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्याधिकारी यासह जबाबदार अधिकाऱ्यांसमवेत ऑनलाईन बैठक घेऊन साथीचे आजार रोखण्यासंबधी प्रशासनाला सूचना केल्या.
मागील आठ दिवसांपासून आ. आशुतोष काळे हे हॉस्पिटलमध्ये कोरोना उपचार घेत आहेत आता त्यांची प्रकृती सुधारत आहे अशी माहिती संपर्क कार्यालयाकडून देण्यात आली मतदारसंघात साथीच्या आजारांचा फैलाव होत असल्याचे समजतात त्यांनी या ही परिस्थिती तातडीने प्रशासनाची ऑनलाईन बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. यावेळी बोलताना आ. आशुतोष काळे म्हणाले, स्वत: जरी जीवघेण्या आजाराशी लढत असलो तरी मतदार संघातील नागरिकांचे आरोग्यदेखील महत्वाचे आहे. तेंव्हा आरोग्य विभागाने यापुढे सतर्क राहावे. नागरिकांमध्ये जनजागृती करून उद्भवणाऱ्या आजारांपासून कसा बचाव करता येईल यासाठी काय काळजी घ्यावी याबाबत सखोल मार्गदर्शन करावे. पावसाळा सुरु असल्यामुळे अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होवून डेंग्यू, चिकन गुनिया, मलेरिया असे अनेक आजार फैलावू शकतात त्यासाठी या पाण्याचा लवकरात लवकर निचरा कसा होईल, यासाठी उपाययोजना कराव्या. असे आजार रोखण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी जंतुनाशक फवारण्या कराव्या अशा सूचना दिल्या. नागरिकांनी देखील प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. कोरोनाचे रुग्ण जरी कमी जास्त प्रमाणात सापडत असले तरी काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना संपलेला नाही, त्याकडे दुर्लक्ष करू नका. स्वत:च्या मनाने घरगुती उपचार घेण्याचे टाळा, डॉक्टरांचा सल्ला घेवून योग्य त्या तपासण्या करून घ्या, आरोग्याच्या बाबतीत सजग राहून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी मतदार संघातील नागरिकांना केले. बैठकीत तहसीलदार विजय बोराडे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, तालुका आरोग्याधिकारी डॉ. विकास घोलप, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर, कोपरगाव नगरपरिषदेच्या डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम रुग्णालयाच्या आरोग्याधिकारी डॉ.श्रीमती गायत्री कांडेकर उपस्थित होत्या.





