पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरीबांना चुलीपर्यंत योजना दिल्या – सौ स्नेहलता कोल्हे,

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरीबांना चुलीपर्यंत योजना दिल्या – सौ स्नेहलता कोल्हे,

Prime Minister Narendra Modi gave a plan to the poor up to the stove – Mrs. Snehalta Kolhe,

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sat25sep 2021, 18:50Pm.

कोपरगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजनांची प्रभावी पद्धतीने अंमलबजावणी करून गरीब कल्याणाचा संकल्प प्रत्यक्षात आणला आहे.गरीबांच्या चुलीपर्यंत विचार केला व १६ योजना बनविल्या त्यांचा थेट तळागाळापर्यंत लाभ पोहोचविला असल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव येथे शनिवारी (२५) रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती व पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढदिवस निमित्त आयोजित लाभार्थी सन्मान दिनी कार्यक्रमात केले. यावेळी विविध योजनेतील लाभार्थींना सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला,

सौ. स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या, विशेष आठवण ठेवून केलेल्या वाढदिवसाने आनंद द्विगुणित होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत साध्या राहणीमानातून आपले जीवन देशाला समर्पित केले. १३० कोटी देशवासियांना जनधन, उज्वला गॅस, शेतकरी सन्मान, स्वच्छ भारत अभियान, मुद्रा लोन, आत्मनिर्भर पथविक्रेते, पीकविमा, अटल पेन्शन, बेटी बचाव बेटी पढाव यासह १६ योजनांचा थेट तळागाळापर्यंत लाभ पोहोचविला आहे. कोरोना काळात ८० कोटी लोकांना मोफत स्वस्त धान्य दिले. कोपरगाव शहर व तालुका भाजपाच्यावतीने धन्यवाद मोदीजी पोष्टकार्ड मोहिम राबवून त्यांचा वाढदिवस अनोख्यारित्या साजरा केला आहे.                         तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी प्रास्ताविक केले. भाजपा युवामोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे यांनी तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या विकासकार्याची माहिती दिली.          

याप्रसंगी भाजपाचे जिल्हा सचिव कैलास खैरे, सहकारमहर्षि कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, विनोद राक्षे,  नरेंद्र  डंबीर, माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, सरचिटणीस दिपक चौधरी, सरपंच सतिष केकाण, प्रशांत वाबळे, शहर उपाध्यक्ष रविंद्र रोहमारे, प्रसाद आढाव, भिमा संवत्सरकर, अल्ताफ कुरेशी, उत्तरनगर जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सिध्दार्थ साठे, तालुका प्रसिध्दीप्रमुख कानिफनाथ गुंजाळ, जयेश बडवे, फकिरमहंमद पहिलवान, अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष खालीलभाई कुरेशी, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष दिपक राउत, दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष मुकूंद काळे, ओबीसी शहराध्यक्ष जगदिश मोरे, तालुका उपाध्यक्ष हरिभाठ लोहकणे, अनुसुचित जाती सेलचे शहराध्यक्ष शंकर बि-हाडे, किसान आघाडीचे शहराध्यक्ष सतिष रानोडे, मनोज इंगळे, सोमनाथ अहिरे, सुनिल बहुळकर, महेश पवार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

           

.

Leave a Reply

You cannot copy content of this page