आधी ४९ कोटीच्या जलवाहिनीची पाण्याची ट्रायल मगच रस्त्यांची कामे करा – मंगेश पाटील

आधी ४९ कोटीच्या जलवाहिनीची पाण्याची ट्रायल मगच रस्त्यांची कामे करा – मंगेश पाटील

First do a water trial of 49 crore  and then do road works – Mangesh Patil

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lSat25sep 2021,19:00Pm.

कोपरगाव : शहराला स्वच्छ पाणी मिळावे यासाठी केंद्र सरकारने ४९ कोटीची पाणी योजना दिली आहे. तेव्हा बहुचर्चित २८ कामातील रस्त्याची सुरुवात करण्यापूर्वी ४९ कोटीच्या ट्रायल घेण्यात यावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्याकडे प्रत्यक्ष भेटीत केली आहे. शहराला स्वच्छ पिण्यासाठी रोज किंवा दिवसाआड पाणी, नगरपालिका देणार कधी ? असे ही पाटील यांनी यावेळी त्यांना विचारले.

यावेळी त्यांच्यासमवेत सामाजिक कार्यकर्ते राजेश मंटाला व शेतीच्या पाणी बाबत ग्रामीण भागातील अभ्यासक तुषार विध्वंस हे होते.

मंगेश पाटील पुढे म्हणाले, सध्या पावसाळा सुरू आहे,धरणे शंभर टक्के भरली आहेत गोदावरी नदी दुथडी भरून जायकवाडी कडे वाहात आहे डावे-उजवे कालवे सुरू असून पालिकेचे साठवण तलावही भरलेले आहेत, भरपूर पाणी आहे , कॅनॉल ने ते ओव्हरफ्लो चे पाणी घेता येईल.हीच त्या नव्या जलवितरण योजनेची ट्रायल घेण्याची योग्य वेळ आहे.यामुळें एक प्रकारे पाईप लाईन चे ऑडिट होईल व त्यातील अर्धवट राहिलेले काम लक्षात येईल व लिकेज कळून जाईल व नगरपालिकेला राहिलेले काम करायला सोपे होइल . असे जर केले तर या मुळे जनतेला घाण गढूळ पाणी मिळुन त्रास होतो तो बंद होईल, ट्रायल झाल्यानंतर या योजनेतील अपूर्णता लिकेज सर्व उघडे पडणार आहे. त्यामुळे रस्ते झाल्यानंतर तोडफोड करून दुरुस्ती करण्यापेक्षा रस्ते करण्यापूर्वीच दुरुस्ती होणे पालिकेच्या आर्थिक हिताचे आहे.असे मत पाटील यांनी व्यक्त केले आहे. जोपर्यंत ही ट्रायल होऊन या योजनेच्या कार्यक्षमतेबद्दल विश्वास निर्माण होत नाही तोपर्यंत कोपरगावकरांच्या नशिबी पावसाळा असो कि उन्हाळा आठ दिवस आड व अस्वच्छ गाळ व गटार मिश्रित गढूळ पाणी कमी दाबाने मिळतच राहणार परिणामतः शहरातील नागरिकांना पोटाचे विकार व साथीचे आजार यांना तोंड द्यावे लागत आहे वीज गेली तर पाणीच भरता येत नाही , अशी वस्तुस्थिती आहे. यात खऱ्या अर्थाने महिला भगिनींचे खूप हाल होतात .या साठी तसेच पाणी साठवण्यासाठी टाक्या कळश्या हंडे डबे ठेवायलाही सर्वसमान्य नागरिकांना जागाही नसते , अशा समस्या पाटील यांनी यावेळी मुख्याधिकारी गोसावी यांच्यासमोर मांडल्या, पाटील म्हणाले, अस्वच्छ घाण पाणी येते या बाबत कितीही तळमळीने बोलले तरी पाणी स्वच्छ मिळू शकणार नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे या साठी महिला भगिनींनी नागरिकांनी नगरपालिके ला आंदोलनाद्वारे ठणकावून सांगणे गरजेचे आहे हे काम का पूर्ण करत नाही याचा जाब विचारून पाणीप्रश्न का सुटत नाही यासाठी एकी दाखवावी व वर्षानुवर्ष असलेली पाणी समस्या तातडीने पूर्ण करायला भाग पाडले पाहिजे.असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page