ग्रामीण भागातील कु.भाग्यश्री वाल्टे हिची आकाशाला गवसणी -सौ स्नेहलता कोल्हे
Mrs. Bhagyashree Walte from the rural area found the sky – Mrs. Snehalta Kolhe
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lSat25sep 2021,19:20Pm.
कोपरगाव : जिद्द, चिकाटी व परिश्रमाची तयारी असेल तर ग्रामीण भागातील युवतीही आकाशाला गवसणी घालू शकते, ही बाब कोपरगाव शहरातील गांधीनगर येथील आई भाजीपाला विक्रीचा तर वडील वडापावची गाडी चालवुन चरितार्थ चालविणाऱ्या दाम्पत्याची मुलगी कु. भाग्यश्री ज्ञानेश्वर वाल्डे हिने थेट बँक ऑफ अमेरिका वॉशिंग्टन डी. सी. येथे सिनीयर टेक असोसिएट अंडर सॉफटवेअर डेव्हलपर ऑफिसर बनून सिध्द करुन दाखविले असल्याचे गौरवोद्गार शनिवारी कुमारी भाग्यश्री चा सत्कार प्रसंगी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले.
यावेळी सहकारमहर्षि कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, उपनगराध्यक्ष अरिफ कुरेशी, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, विनोद राक्षे, दिपक चौधरी आदि उपस्थित होते.
कुमारी भाग्यश्री हिचे दहावी पर्यंतचे शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या डॉ सी एम मेहता कन्या विद्यालय, त्यानंतर आय टी डिप्लोमा संजीवनी इंजिनियरींग कॉलेज, तर बी टेकचे शिक्षण वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजी इन्स्टीटयूट मुंबई येथे झाले. कॅम्पस मुलाखतीतून तिची नुकतीच वार्षीक ३२ लाख रूपये पगारावर निवड झाली आहे. कुमारी भाग्यश्री हिची छोटी बहिणही इन्फरमेशन टेक्नॉलॉजीचे शिक्षण घेत आहे.
भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी आभार मानले.