आश्रम व मंदिराकडील निधीचा वापर उद्योग मंदिरासाठी व्हावा – सौ सुनंदा पवार

आश्रम व मंदिराकडील निधीचा वापर उद्योग मंदिरासाठी व्हावा – सौ सुनंदा पवार

Funds from Ashram and Mandir should be used for Udyog Mandir – Mrs. Sunanda Pawar

समता महिला बचत गट उद्योग देवतेची स्थापनाEstablishment of Samata Mahila Bachat Group Udyog Devta

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun26sep 2021,17:00Pm.

कोपरगाव : ‘देव-देवतां प्रमाणे महिलांच्या आर्थिक संपन्नतेच्या वाटचालीसाठी उद्योग मंदिरे उभारावीत तसेच सरकारने मंदिरांना निधी देताना उद्योग मंदीराची अट घालावी, आश्रम व त्यांच्याकडे असलेल्या निधीचा वापर उद्योग मंदिरासाठी व्हावा, अशी मागणी बारामती भीमथडी जत्रा संयोजिका सुनंदा पवार यांनी कोपरगाव येथे उद्योग मंदिराच्या शुभारंभ प्रसंगी केली. सहकार उद्यमी व समता महिला बचत गटाची वाटचाल स्तुतिपुर्ण असल्याचे ते म्हणाल्या,

सौ सुनंदा पवार, सौ दिपाली चांडक यांचा सत्कार अध्यक्षा सौ अंजली पाटील, समता महिला गटाच्या अध्यक्षा सौ सुहासिनी कोयटे यांनी सौ संगीता साळवे यांची शिराई व सरिता बिरुटे भाज्यांचा गुच्छ देऊन केला. केले. सौ शोभना ठोळे यांनी सौ सुनंदा पवार यांचा सत्कार केला.   सुहासिनी कोयटे म्हणाल्या की, ‘कोयटे परिवार पहिल्यापासूनच व्यवसायात आहे. समता परिवाराचे मार्गदर्शक काका कोयटे यांनी महिला बचत गटांनी उत्पादित मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ देण्याचा मानस आज उद्योग मंदिर उद्घाटनाने  पूर्ण झाला असून गेल्या दोन वर्षापासून समता महिला बचत गटाच्या माध्यमातून अगरबत्ती, कापूर, निरंजनी, समईच्या वाती करीत आहे .             

सौ. अंजली पाटील यांनी सहकार उद्यमीचा उद्देश आणि महिला बचत गटांसाठी चालवण्यात आलेल्या चळवळीची वाटचाल मनोगतातून व्यक्त केली. सौ सुहासिनी कोयटे यांच्या वाढदिवसानिमित्त केक सेलिब्रेशन करण्यात आले. सुधीर डागा यांनी मानपत्र वाचन केले. सौ सुनंदा पवार यांनी कॉप शॉप वर्ल्ड पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. काका कोयटे यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या विझ किड्स स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्यात आली. शिर्डीच्या साई आश्रयाच्या मुलींचा रॅम्प वॉक शो झाला. शो मध्ये मुलींनी ड्रेस हे समता महिला बचत गटाद्वारा शिवणकला ड्रेस परिधान केले होते . शोचे सूत्रसंचालन सौ स्वाती कोयटे यांनी केले शो मार्गदर्शिका रिना जाधव व गणेश दळवी यांचा सत्कार सौ सुनंदा पवार यांनी केला.        

असोसिएशन ऑफ एशियन फेडरेशन ऑफ क्रेडिट युनियनच्या चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर इलेनिता सॅन्ड्रॉक यांनी स्थानिक उत्पादनांना परदेशी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाईन मार्गदर्शन केले. सौ दिपाली चांडक यांनी मार्गदर्शन करत  विसडम एक्स्ट्रा व सहकार उद्योग यांच्यातील समजुतीच्या करारनाम्याचे आदान-प्रदान केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राज्य फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ सुरेखा लवांडे व समताच्या कु.रेणुका मुन्शी यांनी केले तर आभार संचालिका सौ भारती मुथ्था यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page