जिथे संधी मिळेल तेथे रक्तदान करा- सरलादिदी

जिथे संधी मिळेल तेथे रक्तदान करा- सरलादिदी

Donate blood wherever there is an opportunity- Sarladidi

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun26sep 2021,17:20Pm.

कोपरगाव :  रक्त हे पवित्र व परमेश्वरी देण आहे.  संकटात मानवाला रक्तदानाचे महत्व समजते, कोरोना महामारीमुळे जगात रक्ताचा तुटवडा भासत आहे तेव्हा प्रत्येकाने जेथे जेथे संधी मिळेल तेथे रक्तदान करावे असे आवाहन ब्रम्हकुमारी ओम शांती कोपरगांवच्या सरलादिदी यांनी केले.

    येथील साई हेल्थ केअर फाउंडेशन चॅरिटेबल संचलित व संजीवनी ब्लड सेंटर, संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने स्व. रविंद्र तारडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लायन्स भवन फादरवाडी कोपरगांव येथे रविवारी रक्तदान शिबीरात त्या बोलत होत्या.             प्रारंभी श्रीमती प्रियंका रविंद्र तारडे यांनी स्वागत व प्रास्तविक केले. याप्रसंगी अमृत संजीवनीचे अध्यक्ष पराग संधान, स्वप्नील निखाडे, रोहित वाघ, पल्लवी सोळंके, नंदकिशोर सोळंके (अमरावती), गजानन पाटणकर, किरण जाधव, सुरेश थिगळे, कस्तुरी शॉपीचे सर्व सहकारी, देविदास रोहोम आदि उपस्थित होते. डॉ झिया शेख यांनी रक्तदान का आणि कुणी करावे याबाबत माहिती दिली.        

   श्रीमती सरलादिदी पुढे म्हणाल्या की, कोरोना जागतिक महामारीत प्रत्येकजण आपत्तीग्रस्त झाला आहे. दैनंदिन व्यवहारात अन्नदान, नित्यदान जसे महत्वाचे आहे तसेच रक्तदानही जास्त महत्वाचे आहे. स्व. रविंद्र तारडे हे त्यांचा प्रत्येक वाढदिवस रक्तदानाने साजरा करावा. संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांचे त्यांनी कौतुक केले. 

 कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार स्वियय सहाय्य आयूब पठाण, राहुल उगले यांनी केले.  

Leave a Reply

You cannot copy content of this page