साईबाबा कॉर्नर ते रेल्वेस्टेशन रस्ता काम निकृष्ट ; गुणवत्ता तपासणीची सौ कोल्हे यांची मागणी

साईबाबा कॉर्नर ते रेल्वेस्टेशन रस्ता काम निकृष्ट ; गुणवत्ता तपासणीची सौ कोल्हे यांची मागणी

Inferior road work from Saibaba Corner to Railway Station; Mrs. Kolhe’s demand for quality inspection

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu 30sep 2021,17:40Pm.

कोपरगांव : विधानसभा मतदार संघातील रस्त्यांच्या कामासाठी शासनाकडुन कोटयावधी रुपयांचा निधी आपण मंजुर करून आणला परंतु संबंधीत सार्वजनिक विभागाच्या कार्यान्वयीन यंत्रणेने कामाच्या गुणवत्तेबाबत निष्काळजीपणा केल्यामुळे पहिल्याच पावसाळ्यात या रस्त्याचे तीन तेरा वाजले आहे तर तीच अवस्था प्रमुख राज्यमार्ग ८ पासुन कोपरगांव पढेगांव उक्कडगांव वैजापुर या राज्यमार्ग ६५ रस्त्याची गुणवत्ता तपासावी अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता पी. बी. भोसले यांच्याकडे केली आहे.

सौ. स्नेहलता कोल्हे यांनी आपल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, कोपरगांव पढेगांव उक्कडगांव वैजापुर रस्त्याचे कामासाठी आपल्या विधानसभा कार्यकाळात केंद्रीय रस्ते मार्ग निधीतून ७ कोटी ५० लाख रूपये मंजूर करून आणले साईबाबा कॉर्नर ते रेल्वेस्टेशन रोड हे कामही पुर्णत्वाकडे चालले आहे परंतु या रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत आहे. पहिल्याच पावसाळयात यास अनेक ठिकाणी खडडे पडले आहेत त्यातून अपघात होवुन वाहनधारकांना इजा होण्याचा संभव आहे. या रस्त्याचे बाजूला असलेल्या गटारीचे ढापे देखील बसविलेले नाही, जे काम केले निकृष्ट प्रतीचे असून ते अनेक ठिकाणी कोलमडून पडले आहे. अंदाजपत्रकानुसर ठरलेल्या गुणवत्तेच्या प्रमाणे कामाचा दर्जा नाही याबाबतच्या असंख्य तकारी नागरिकांनी आपल्याकडे केल्या आहेत या रस्त्यावरून शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेणiरे विद्यार्थी, सहकारी साखर कारखाना, दुध संघ, औद्योगिक वसाहत, तालुक्याच्या तसेच वैजापुर, औरगाबाद या ठिकाणी ये जा करणारे प्रवासी साईभक्त, वाहनचालक, प्रवासी वाहतुक करणार रिक्षा-अँपे चालक, शेतकरी आदिंची मोठया प्रमाणात वर्दळ असते तेव्हा या रस्त्याची पाहणी करून, रस्ता कामाचा दर्जा गुणवत्तेनुसार पुर्ण करून व खडडयांची, गटार, ढाप्याची तातडीने दुरुस्ती करावी असेही त्यांनी शेवटी म्हटले आहे.सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्री यांनाही याकामाची वस्तुस्थिती अवगत करण्यांत आली आहे. संदर्भ रस्त्याबाबत सर्व ठिकाणं कडून येणाऱ्या तक्रारींची दखल घेत गेल्या आठवड्यात नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) या खात्यांचे कॅबिनेट मंत्री, राज्याचे रस्ते विकास महामंडळाचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी ठेकेदारच नाही तर रस्त्यांची गुणवत्ता तपासणाऱ्या अधिकाऱ्यांवरही होणार कारवाई”, असल्याचे स्पष्ट आदेश दिले होते

Leave a Reply

You cannot copy content of this page