येवला नाका स्टेशन रोड रस्त्याची चाळण, लोक हैराण, प्रशासन गपगुमान! 

येवला नाका स्टेशन रोड रस्त्याची चाळण, लोक हैराण, प्रशासन गपगुमान !

Yeola Naka Station Road road siege, harassing people, administration gossiping!

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu 30sep 2021,18:00Pm.

 कोपरगाव : शहरातील सद्गुरू गंगागिरी महाविद्यालयाच्या उत्तरेकडील येवला नाका वडांगळे वस्ती स्टेशन रोड रस्त्याचे सध्या तीन तेरा वाजले असून त्यातच प्रचंड प्रमाणात कोसळणाऱया पावसामुळे येथील लोक अक्षरशः हैराण झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम खाते मात्र गपगुमान आहे.

हा रस्ता वर्षभरापूर्वी झाला होता पण दर्जेदार नसल्यामुळे काही महिन्यात या रस्त्याचे तीन तेरा वाजतात, मुळात हा रस्ता दोन्ही बाजूकडून खोल झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी कायम पाणी साचून राहते, साचलेल्या पाण्यामुळे रस्ता टिकत नाही. या ठिकाणी मोठ्या अवजड वाहनांची वर्दळ असते, त्यामुळे हा रस्ता तयार करताना दोन्ही बाजूच्या साईड पट्टयापेक्षा भर टाकून वर उचलण्याची गरज असून दोन्ही बाजूला उतार दिला पाहिजे. तरच हा रस्ता भविष्यात टिकू शकेल.

नगर – मनमाड महामार्ग व कोपरगाव रेल्वेस्टेशन रोड यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावर सद्गुरू गंगागिरी महाविद्यालय,गॅस कंपनी, वीज वितरण कंपनी प्रमुख सबस्टेशन, महिला महाविद्यालय, वडांगळे वस्ती, कालिका नगर, बागुल वस्ती या मोठ्या रहिवासी वसाहती, इंजिनिअरिंग महाविद्यालय, कोल्हे कारखाना कामगार, औद्योगिक वसाहत ,गोदावरी दुध संघ,जिनिंग प्रेस, रेल्वेस्टेशन, विद्यार्थी, कामगार, प्रवासी यांची मोठी वर्दळ असल्याने हा फार महत्त्वाचा रस्ता आहे. वर्षभरापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण झाले होते, पण त्याची दुर्दशा संपता संपेना, सध्या या रस्त्यावरून मोठय़ा प्रमाणात दोन्ही बाजूकडून येणारे पाणी वाहत असून याच पाण्यातून वाट काढत या रस्त्यावर कॉलेज विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक शिक्षिका महिला नागरिक व कामगार यापैकी बरेच जण सायकल वा दुचाकीने ये-जा करतात, त्यांना चिखल आणि खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे बहुतेकदा मध्येच गाड्या बंद पडतात, त्यामुळे थेट दुर्गंधीयुक्त पाण्याच्या डबक्यातच उतरण्याची अनेक महिला मुली व नागरिकांवर वेळ येते, त्यामुळे कपडे खराब होतात अशा अनेक समस्यांना सध्या तोंड द्यावे लागत आहे.  रस्त्याच्या दोन्ही साईड ने उंचवटे असल्याने व पाणी निघून जाण्यासाठी कुठलीही व्यवस्था केली नसल्यामुळे या पाण्याचा निचरा होत नाही, या ठिकाणी दोन्ही बाजूंनी दाट झाडी असल्यामुळे सूर्यप्रकाशही पोहोचत नाही परिणामतः हे साचलेले पाणी महिना-महिना साचून दुर्गंधी पसरते, या साचलेल्या पाण्यामुळे डास, चाचण यांचा प्रादुर्भाव वाढतो, विद्यार्थी, महिला, मुली या सर्वांना तोंड द्यावे लागते . या रस्त्यावर कॉलेज विद्यार्थी, विद्यार्थिनी, कामगार  सायकल ने दुचाकीने वाहतूक करत आहे. रस्त्याच्या बिकट परिस्थितीमुळे त्यांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते. या रस्त्यावरून दुचाकी, चारचाकी वाहने घेऊन जाणे म्हणजे जिकिरीचे आहे. येवला नाक्यापासून स्टेशन रोड पर्यंत सुमारे अर्धा किलोमीटर अंतरात हा रस्ता आहे. मुळात रस्त्याची सुधारणा व डांबरीकरण करताना कंत्राटदाराने अनेक ठिकाणी पाणी वाहून जाण्यासाठी पाईप टाकून वाट करून दिली नाही. त्यामुळेच या रस्त्याचे डबके झाली आहे

हिच ती गटार

कोट १

नगरसेवक विजय वाजे

पूर्वी या भागात  शेतीच्या पाण्यासाठी  चा-या असल्यामुळे अंबिकानगर कमान, शारदानगर या सर्व परिसरातील पाणी सद्गुरू गंगागिरी महाराज कॉलेजच्या येवला नाका स्टेशन रोडकडे येते व तेथेच साचून राहते हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ताब्यात असून त्यांचे याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. पालिकेच्या ताब्यात नसल्यामुळे मला या रस्त्याचे काम करता आले नाही  या रस्त्याचे पाणी नव्याने सुरू असलेल्या स्टेशन स्टेशन रोडवरील साईडच्या गटारांमध्ये सोडण्यात आले होते परंतु ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ही गटार ढासळली आहे. त्यामुळे या रस्त्याची गटार  झाली आहे.

कोट २

माजी नगरसेवक विजय वडांगळे

येवला नाका ते स्टेशन रोड हा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असून वीज वितरण कंपनी सब स्टेशन व त्यांचे वाद असल्यामुळे या रस्त्याचे काम नीट होत नाही एक तर हा रस्ता दर्जेदार बनवून वाहतूक सुरळीत करावी, अन्यथा हा रस्ता कायमस्वरूपी बंद करून  रस्त्यासाठी आमची घेतलेली जमीन आम्हाला परत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग अवलंब करावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे

Leave a Reply

You cannot copy content of this page