कोरोना आपत्ती , संजीवनी महिला बचत गटासाठी ठरली इष्टापत्ती – सौ.स्नेहलता कोल्हे
बनवले अडीच लाखाहून अधिक मास्क
कोपरगाव – मास्क निर्मितीचा निर्णय घेतल्याने कोरोना आपत्ती , संजीवनी महिला बचत गटाच्या महिलांच्या कुटुंबाला आर्थिक आधार देणारी इष्टापत्ती ठरली असल्याचे प्रतिपादन भा ज पा प्रदेश सचिव व संजीवनी महिला बचत गटाच्या मार्गदर्शिका माजी आ. सौ स्नेहलता कोल्हे यांनी केले.
बाजारातील मास्कचा तुटवडा लक्षात घेऊन , संधी ओळखून संजीवनी बचत गटाच्या अध्यक्ष सौ रेणुका विवेक कोल्हे यांनी आर्थीक विवंचनेत असलेल्या बचत गटांच्या महिलां मार्फत मास्क तयार करण्याचा निर्णय घेतला व काम सुरू केले . बघता बघता या मास्कला राज्याभरातील पुणे, नाशिक, धुळे, मालेगांव, मुंबई, औरंगाबाद, जालना आदी ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने मास्क तयार करण्याचे जोरात काम सुरू आहे. सुमारे अडीच लाखापेक्षा जास्त मास्क राज्यभरात पुरविण्यात आले.