कोकणठाण शिवारात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
आत्महत्या
वृत्तवेध ऑनलाईन | 11 Jul 2020,
कोपरगाव
कोपरगाव तालुक्यातील कोकणठात परिसरात एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कु उज्ज्वला भगवान शेळके (वय २४,रा. कोकणठाण , कोपरगाव ) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ही घटना रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
कोपरगाव शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमारी उज्वला हिने शनिवारी रात्री घरासमोरील पढवीच्या लोखंडी अँगलला नायलॉनच्या ओढणीने गळफास घेतल्याचे आढळून आले. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नसल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी तिचे वडील भगवान बाबुराव शेळके (५५) धंदा नोकरी यांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला खबर दिली. सदर खबरीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. पुढील तपास कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक ८५६ ए. एम. दारकुंडे करीत आहे.