रस्त्याच्या साईडपटटया व गटार कामासाठी निधी द्या-स्नेहलता कोल्हे

रस्त्याच्या साईडपटटया व गटार कामासाठी निधी द्या-स्नेहलता कोल्हे

Provide funds for roadside and sewerage works – Snehalta Kolhe

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir1Oct 2021,18:20Pm.

कोपरगांव:   दळणवळणांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या प्रमुख जिल्हा मार्ग ५ रवंदे,टाकळी, पवार गिरणी, राउत वस्ती ते राज्यमार्ग ६५ पर्यंतच्या कोपरगांव पढेगांव वैजापुर रस्त्याच्या साईडपटटया व गटार कामासाठी तात्काळ निधी मिळावा व या रस्त्यास पडलेले खडडे तातडीने बुजविण्यांत यावे अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी नाशिकचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता पी. बी. भोसले, अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता संगमनेर यांच्याकडे केली आहे.

स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, या रस्त्याचे काम आपल्या कार्यकाळात पुर्ण झालेले आहे. मात्र पावसाळ्यात त्यास मोठया प्रमाणात खड्डे पडले आहेत परिणामी वाहतुकीची कोंडी होते. या रस्त्याचा वापर वाहनधारकासह पादचारी, दुचाकीस्वार, शेतकरी, महाविद्यालयीन, शाळकरी मुले मुली व तालुक्याच्या तसेच औरंगाबाद, नाशिक जिल्हयाच्या ठिकाणी ये जा करण्यासाठी होत आहे. साईडपटटया व गटारचे काम व्हावे म्हणून या भागातील वाहनधारकांनी आपल्याकडे मागणी केली आहे तेव्हा या रस्त्याचे साईडपटटयाचे व सखल भागात साठणारे पाणी वाहुन जाण्यांसाठी गटार काम बाकी आहे त्यास तातडीने निधी देवुन हे काम वेळेत मार्गी लावावे.

Leave a Reply

You cannot copy content of this page