विमा कंपनीने जोखीम काळात सर्वाधिक परतावा देऊन सर्वांना आधार द्यावा- बिपीन कोल्हे

विमा कंपनीने जोखीम काळात सर्वाधिक परतावा देऊन सर्वांना आधार द्यावा- बिपीन कोल्हे

The insurance company should support everyone by giving the highest return in the risky period – Bipin Kolhe

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir1Oct 2021,18:30Pm.

कोपरगाव :विमा संरक्षण काळाची गरज आहे. विमा कंपनीने सहकारी साखर कारखान्यांसाठी सभासद, शेतकरी, उस उत्पादक, कामगार आदिसाठी त्यांच्या खिशाला परवडेल आशा विमा पॉलीसी काढाव्यात व जोखीम काळात सर्वाधिक परतावा देऊन सर्वांना आधार द्यावा.अशी मागणी गुरुवारी (३०) रोजी सहकारमहर्षी कोल्हे कारखान्यांचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी इंडिया इंशुरन्सचे डिव्हीजनल मॅनेजर  प्रेमचंद मोरे यांच्या सत्कार प्रसंगी केली.

या प्रसंगी कारखान्याचे संचालक विवेक कोल्हे, फकीरराव बोरणारे, भास्करराव भिंगारे, ज्ञानेश्वर परजने, निवृत्ती बनकर, साहेबराव कदम,  शिवाजीराव वक्ते, अरूणराव येवले, अशोकराव औताडे,  सोपानराव पानगव्हाणे, संजय होन, विलास वाबळे, मनेश गाडे, संगिता राजेंद्र नरोडे, श्रीमती सोनुबाई दशरथ भाकरे, प्रदीप नवले, राजेंद्र कोळपे, मच्छिंद्र लोणारी, कामगार संचालक वेणुनाथ बोळिज, बी.एम. वक्ते, श्री. शेख आदी उपस्थीत होते. प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, साखर सरख्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी स्वागत केले; लेखापाल एस.एन. पवार, उपमुख्यलेखापाल प्रविन टेमगर यांनी कारखाना विमाबद्दल माहिती दिली. शेवटी उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी आभार मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page