चार वर्षाचा पाठपुरावा ब्राम्हणगाव शेतकरी प्रशासनापुढे झाले हतबल
The four-year follow-up was hampered by the Bramhangaon farmers’ administration
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir1Oct 2021,18:40Pm.
कोपरगाव : तालुक्यातील ब्राम्हणगांव शिवारात गट नंबर ३६२ व त्याशेजारील अन्य आठ शेतक-यांचे गट नंबर येससांव ब्राम्हणगांव रस्त्याच्या कामामुळे बाधित झाले आहेत, रस्ता कामात ठेकेदाराने पुर्वीच्या नळया काढून टाकल्या परिणामी या सर्व शेतक-यांच्या शेतात पावसाचे पाणी प्रचंड प्रमाणात साठले जाते त्यातुन कोटयावधी रूपये किंमतीच्या पिकांची नासाडी होते याबाबत गेल्या चार वर्षापासुन पाठपुरावा करतो पण सिमेंट नळया काही टाकल्या जात नाही अशी तकार सुभाष शामराव गाडे यांच्यासह अन्य शेतक-यांनी केली आहे, शेतकरी प्रशासनापुढे हतबल झाले आहेत.
पक्क्या स्वरूपाचे काम करून या पाण्याचा निचरा व्हावा अशी या शेतक-यांची मागणी आहे पण या कामाला १४६० दिवस उलटुनही मुहूर्त लागलेला नाही ही शोकांतिका आहे, अजून किती पावसाळ्यात आमचे पिके उध्वस्त होणार असे सुभाष गाडे शेवटी म्हणाले,