कोपरगांव पिपल्स बॅक ७३ वी वार्षिक सभा ; सभासदांना १५ टक्के लाभांश देणार- सत्येन मुंदडा

कोपरगांव पिपल्स बॅंक ७३ वी वार्षिक सभा ; सभासदांना १५ टक्के लाभांश देणार- सत्येन मुंदडा

Kopargaon People’s Bank 73rd Annual Meeting; 15% dividend to be paid to members – Satyen Mundada

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir1Oct 2021,18:50Pm.

कोपरगांव : बॅंकेस लेखापरीक्षणात अ वर्ग मिळाला आहे तर सभासदांना १५ टक्के लाभांश वाटप करण्यात येईल अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष सत्येन सुभाष मुंदडा यांनी गुरुवारी (३०) रोजी झालेल्या दि कोपरगांव पिपल्स को-ऑप बॅंक लि,. ७३ व्या ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदावरून बोलताना दिली.

बॅंकेचे असि. जनरल मॅनेजर जितेंद्र छाजेड यांनी सभेतील विषय पत्रिकेनुसार वाचन केले व सर्व ठराव बहुमताने मंजूर झाले. चेअरमन सत्येन मुंदडा यांनी बॅंकेचे आर्थिक स्थीतीची माहिती देतांना कोविड महामारीच्या काळात बॅंकेच्या मा. संचालक मंडळाच्या धोरणात्मक निर्णयानुसार बॅंकेच्या आर्थिक स्थैर्यात विशेषता मा. रिझर्व्ह बॅक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक मापदंडाप्रमाणे आर्थिक निकषांत भर घालुन बॅंकेची आर्थिक स्थिती अधिक सुदृढ व निकोप वाढविलेली आहे. आगामी काळात बॅंकेने मोबाईल बॅंकींग व नेट बॅंकींग सुरु करणे सुरक्षित उत्तम साॅफटवेअर प्रणाली घेतली एसएमएस सुविधा खातेदारांना मोबाईलवर खात्याची माहिती देण्याची सुविधा यासाठी खातेदारांनी आपला मोबाईल नंबर नोंदवावा असे आवाहन चेअरमन सत्येन मुंदडा यांनी केले. रविकाका बोरावके म्हणाले, जळीतानंतर २७ बँकेने मोठी उभारी घेतली व कोरोना संकटाला तोंड देऊन ग्राहकांना सेवा देणारी एकमेव बँक आहे. केशवराव भंवर, सुधिर बज यांनीही चर्चेत भाग घेतला. सभासदांचे प्रश्नावर जनरल मॅनेजर दिपक एकबोटे यांनी समर्पक उत्तरे दिली. सभा संपल्यानंतर बॅकेचे सभासद डाॅ. एकनाथ गोंदकर, अविनाश दंडवते, महेंद्र शेळके यांची श्री साईबाबा संस्थान, शिर्डीचे विश्वस्तपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बॅंकेचे संचालक कैलासचंद ठोळे, डाॅ. विजय कोठारी, सुनिल कंगले, रविंद्र लोहाडे, धरमचंद बागरेचा, कल्पेश शहा, अतुल काले, राजेंद्र शिंगी, सुनिल बंब, वसंतराव आव्हाड, यशवंत आबनावे, हेमंत बोरावके, रविंद्र ठोळे, सेवक संचालक विरेश पैठणकर, विठ्ठल रोठे उपस्थित होते. शेवटी चेअरमन श्री सत्येन मुंदडा यांनी सर्व सभासदांचे तसेच ऑनलाईन मिटींग करीता सेवा देणारे श्री नितीन बागरेचा यांची सर्व टीम तसेच आय.टी. विभागातील मुख्य सिनिअर ऑफीसर श्री चंद्रशेखर व्यास, त्यांचे सहकारी श्री गणेश काळे यांचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page