बेघर नागरिकांना हक्काची घरे देण्यासाठी डीपीआर तयार करा-आशुतोष काळे
Create DPR to give rightful houses to homeless citizens-Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir1Oct 2021,19:00Pm.
कोपरगाव : शहरातील आजही घरापसुन वंचित असणा-या बेघरांना हक्काची घरे मिळावी यासाठी नगरपालिकेने डीपीआर तयार करावा अशा आमदार आशुतोष काळे यांच्या सूचना असणारे निवेदन कोपरगाव शहर राष्ट्रवादीच्या पदाधिकारी यांनी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना दिले.
बेघरांना घरे त्यासाठी शासनाचा अनेक योजना राबविल्या जात आहेत. यातील पात्र असुनही वंचित असलेल्यांना घरे मिळवून देण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या वतीने पालिकेला सूचनांचे निवेदन शुक्रवारी (१) रोजी देण्यात आले आहे. कुटुंबांची नोंदणी करा, आवास योजनेच्या नियमात बसविण्यासाठी आय.एस.एस.आर., सी.एल.एस.आय., ए.एच.पी., बी.एल.सी. या सर्व योजनांची अंमलबजावणी करा. ज्यांना जागेची अडचण आहे त्यांना कोपरगाव नगरपरिषदेच्या मालकीच्या जागेवर अॅफार्डेबल हाऊसिंग प्रोजेक्ट तयार करून मुख्याधिकाऱ्यांनी पाहणी करून डीपीआर तयार करावा. जिथे जागा नाही तिथे असणाऱ्या कुटुंबाना घरे देण्यासाठी प्रस्ताव तयार करा. बेघर असणाऱ्या नागरिकांना हक्काची घरे मिळवून देण्यासाठी आपण पाठपुरावा करू असे आ. आशुतोष काळे यांनी निवेदनात म्हटले आहे. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनिल गंगुले, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, सौ. प्रतिभा शिलेदार, सौ. वर्षा शिंगाडे, शिवसेनेचे शहरप्रमुख कलविदरसिंग डडीयाल, सुनिल शिलेदार, राजेंद्र वाघचौरे, कृष्णा आढाव, फकीर कुरेशी,विजय त्रिभुवन, रमेश गवळी आदि उपस्थित होते.