कोपरगाव झगडे फाटा ते वडगाव पान रस्त्याचे खड्डे बुजविण्यास सुरवात
Kopargaon Jhagde Fata to Wadgaon Paan road potholes started to be filled
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir1Oct 2021,19:20Pm.
कोपरगाव : तालुक्यातील झगडे फाटा ते वडगाव पान या जवळपास ३५ किलोमीटर अंतर असलेल्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या आमदार आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम खात्याने खड्डे बुजविण्याच्या कामास सुरुवात केली आहे.
कोपरगाव संगमनेर-वडगाव पान फाटा–तळेगाव- झगडे फाटा- हा जवळचा मार्ग असल्याने शिर्डी जाणारी अवजड वाहतूक या रस्त्याने सुरू होती त्यामुळे खड्डे पडून या रस्त्याची चाळण झाली होती. मतदारसंघातून जाणाऱ्या झगडे फाटा-तळेगाव-वडगाव पान (राज्य मार्ग ६५) सावळीविहीर- चास-भरवस- लासलगाव (राज्य मार्ग ७) या त्याच्या निधीसाठी पाठपुरावा केला होता त्याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाने या दोन्ही मार्गाच्या नूतनीकरणासाठी आशियाई विकास बँक अर्थसहाय्य अंतर्गत पहिल्या टप्प्यात समावेश करण्याची ग्वाही दिलेली आहे. राज्यमार्ग ७ वरील देर्डे फाटा ते भरवस फाटा या रस्त्यावरील देर्डे ते मोर्वीस तालुका हद्दीतील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या सूचना दिल्या आहेत. खड्डे लवकरच भरण्यात येतील असे बांधकाम विभागाचे उपाभियंता प्रशांत वाकचौरे यांनी सांगितले आहे.