सावळीविहीर ते सेंधवा (म.प्र.) ‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित’ नितीन गडकरी यांची घोषणा -आ. आशुतोष काळे

सावळीविहीर ते सेंधवा (म.प्र.) ‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित’ नितीन गडकरी यांची घोषणा -आ. आशुतोष काळे

Savlivihir to Sendhwa (MP) ‘Transferred to National Highways Authority’ Nitin Gadkari’s announcement -MLA. Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sat 2 Oct 2021,15:00Pm.

कोपरगाव : सावळीविहीर ते सेंधवा (म.प्र.) एन.एच.७५२ जी हा ‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित’ करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी नगर येथील कार्यक्रमात केली. असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.

नगर येथे शनिवारी (२) रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज तब्बल ४०७५ कोटी किंमतीच्या सहा प्रकल्पांचे भूमिपूजन आणि पाच रस्त्यांचे लोकापर्ण ​सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. तसेच यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, आमदार, खासदार उपस्थित होते असे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले.

नामदार नितीन गडकरी यांची दिल्ली येथे डिसेंबर २०२० मध्ये प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देताना आमदार आशुतोष काळे ( संग्रहित फोटो)

सावळीविहीर ते सेंधवा (म.प्र.) हा एन.एच.७५२ जी राष्ट्रीय महामार्ग राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण करून मतदार संघातील रस्ते व पूल बांधणीसाठी निधी द्या अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी डिसेंबर २०२० मध्ये दिल्ली येथे प्रत्यक्ष भेट घेऊन केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली होती .

कोपरगाव तालुक्यातून जात असलेला व नव्याने घोषित झालेला सावळीविहीर ते सेंधवा (म.प्र.) या मार्गाला एन.एच.७५२ जी हा क्रमांक देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या मार्गाचे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण झाले नसल्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद झालेली नाही.त्यासाठी या नवीन राष्ट्रीय महामार्गाचे तातडीने राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण व्हावे यासाठी आपण सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला मंत्री नितिन गडकरी यांनी आज नगर येथे केलेल्या घोषणेमुळे यश आले असून आता हा रस्ता होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अशा भावना सध्या रुग्णालयात कोरोना उपचार घेत असताना रुग्णालयातील बेडवरून व्यक्त केल्या.व याबद्दल नामदार नितीन गडकरी यांचे आभार व्यक्त केले

 

 

Leave a Reply

You cannot copy content of this page