मंत्री गडकरी यांच्याकडे एन.एच.७५२ जी १८ किमी. रस्त्यासाठी सौ कोल्हे यांची निधीची मागणी
Minister Gadkari has NH 752G 18 km. Mrs. Kolhe’s demand for funds for the road
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sat 2 Oct 2021,16:10Pm.
कोपरगाव : कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील प्रमुख राज्य मार्ग ८ हा मोठ्या प्रमाणात खराब झालेला आहे व साईबाबा शिर्डी आंतरराष्ट्रीय धार्मिक स्थळासाठी नव्याने घोषित करण्यात आलेला प्रमुख राष्ट्रीय महामार्ग एन एच ७५२ जी याचे काम सुरू आहे तेंव्हा राहाता तालुका हद्द ते नाशिक जिल्हा हद्द या अठरा किलोमीटरच्या रस्त्यासाठी तातडीने निधी देऊन याचे काम तात्काळ मार्गी लावावे या मागणीचे निवेदन सौ कोल्हे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना शनिवारी अहमदनगर येथे दिले.
सौ. स्नेहलता कोल्हे यांनी दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, कोपरगाव तालुक्याचे ऐतिहासिक महत्व मोठे असून त्याचे पर्यटनात महत्व वाढावे, याचा विकास व्हावा व येथील व्यवसायाला गती मिळावी. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय धार्मिक स्थळ असलेल श्री साईबाबा संस्थान शिर्डी येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते त्यांचा प्रवास सुखकर व्हावा या उद्देशाने निधीची तात्काळ गरज आहे, त्याचप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२ राज्यमार्ग 65 संगमनेर तालुका हद्द ते झगडे फाटा चौफुली या 16.5 किलोमीटर लांबीच्या, राज्यमार्ग ७ नाशिक जिल्ह्य ते दर्डे फाटा या २२ किलोमीटर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते, या परिसरात काकडी विमानतळ, आंतरराष्ट्रीय देवस्थान साईबाबा शिर्डी, तसेच कोपरगाव परिसरातील पेशवे राघोबादादा वाडा, साईबाबा तपोभूमी, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी, महानुभाव पंथीय श्री कृष्ण मंदिर, ऐतिहासिक कोकमठाण चे लक्ष्मी माता, रामदासी बाबा मंदिर, कोपरगाव बेट भागातील गुरु शुक्राचार्य, कचेश्वर देवस्थान, कुंभारी राघवेश्वर मंदिर, संवत्सर येथील शृंघेरश्रीक्षेत्र मंजूर देवस्थान, धामोरी चे गोरक्षनाथ मंदिर, उक्कडगाव येथील रेणुका माता, कानेगाव गाव येथील नृसिंह मंदिर, आदी धार्मिक स्थानांवर दूरवरून येणारे भाविक दर्शनासाठी या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात विविध राज्यातून तसेच देश विदेशातून मोठ्या प्रमाणात भाविक तसेच शेतकरी, महाविद्यालयीन शिक्षण घेणारे विद्यार्थी, जिल्हा अंतर्गत वाहतूक करणारे प्रवासी त्यांचे वाहनाने या रस्त्याचा वापर करत असतात, तेव्हा दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या रस्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सौ कोल्हे यांनी केली आहे, त्यास केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.





