शहरातील मुख्य रस्त्यावर कोणालाही प्रवेशद्वार बांधण्यास परवानगी देऊ नका!- शिवसेना  

शहरातील मुख्य रस्त्यावर कोणालाही प्रवेशद्वार बांधण्यास परवानगी देऊ नका!- शिवसेना

Don’t allow anyone to build an entrance on the main road of the city! – Shiv Sena

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sat 2 Oct 2021,16:30Pm.

कोपरगाव : शहरातील मुख्य (जुना नगर – मनमाड) या रस्त्याच्या दोन्ही बाजुने मुख्य पाणी वितरिका, बीएसएनएल व वीज कंपनी,मोबाइल टॉवरच्या च्या भुमीगत वाहिका टाकलेल्या आहेत, भविष्यात यात काही बिघाड झाल्यास त्याचा धक्का प्रवेशद्वारांना बसू शकतो त्यातून तणाव निर्माण होऊ शकतो, या गोष्टी गृहीत धरणे आवश्यक आहे तसेच अधुन मधुन नगर-मनमाड महामार्गावर मोठी दुर्घटना घडल्यास पर्यायी असलेल्या शहरातील या मार्गावर अवजड वाहतूक कोंडी होऊ नये हे सर्व रोखण्यासाठी शहरातील मुख्य रस्त्यावर कुठल्याही महापुरुषांच्या नावाचे प्रवेशद्वार बांधण्यास परवानगी देऊ नका अशी मागणी कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख यांनी कलविंदरसिंग डडियाल यांनी कोपरगाव नगरपालिका मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्याकडे शुक्रवारी (1) रोजी निवेदन देऊन केली आहे .

शिवसेनेने या निवेदनात म्हटले आहे की, सदर रस्त्याच्या कडेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक आहे त्या स्मारकासमोवरील रस्त्यावर अनधिकृत, विनापरवाना,बेकायदेशीर, कोणतीही तांत्रिक मंजुरी न घेता.तसेच कोणतीही शासकीय मंजुरी न घेता भव्य कमानीचे काम सुरू आहे. कोपरगाव शहरात सर्व जातीय धर्म यांमध्ये सामाजिक सलोखा आहे, शांतता आहे, परंतु या कमानी (प्रवेशद्वार) बांधण्याच्या स्पर्धेमुळे संपूर्ण सामाजिक सलोखा व शांतता बिघडू शकते व फार मोठा अनर्थ होऊन दंगल देखील होऊ शकते याची कृपया गंभीर दखल घ्यावी,असे नमूद केले आहे प्रत्येकाने जर प्रमुख रस्त्यावर प्रवेशद्वार बांधण्याचे ठरविल्यास शहरातील सामाजिक संघटना व राजकीय पक्ष यांचा विचार करता २० ते २५ कमानी उभारल्या जातील . यातून होणाऱ्या जीवघेण्या स्पर्धेमुळे शहरातील शांतता भंग होण्याचा संभव आहे. याची कृपया गांभीर्याने दखल घ्यावी.असे निवेदनात नमूद केले असून, या निवेदनाच्या प्रती तहसीलदार विजय बोरुडे, पोलिस निरिक्षक वासुदेव देसले त्याच बरोबर जिल्हाधिकारी, अहमदनगर पोलिस अधिक्षक यांना पाठविल्या असल्याची माहिती शहरप्रमुख कलविंदरसिंग डडियाल यांनी दिली आहे.

चौकट

यापूर्वी मराठा क्रांती मोर्चा यांनी नगरपालिकेकडे याच रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराज, मांसाहेब राजमाता जिजाऊ, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, नरवीर बाजीप्रभू देशपांडे या महापुरुषांच्या नावाचे प्रवेशद्वार बांधण्यास परवानगी मागितली आहे. त्यामुळे एकाला परवानगी दिल्यास सर्वांनाच परवानगी द्यावी लागेल त्यामुळे रस्ता कमी व महापुरुषांच्या नावाची प्रवेशद्वारेच जास्त होतील.- शिवसेना माजी शहरप्रमुख भरत मोरे

Leave a Reply

You cannot copy content of this page