विरोधकांच्या निष्क्रियतेला कंटाळून धामोरीतील शेकडो कार्यकर्ते भाजपात
Hundreds of BJP workers in Dhamori fed up with the inaction of the opposition
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun 3 Oct 2021,16:30Pm.
कोपरगाव :जिल्हा बँकेचे संचालक युवानेते विवेक कोल्हे तसेच उपसरपंच प्रभाकर विठ्ठल मांजरे यांचे उपस्थितीत अविनाश बाळासाहेब आहिरे, अमोल आहिरे,आकिल शेख, सूरज आहिरे यासह धामोरीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी फसवे धोरण व आश्वासन पुर्ती न विरोधकांवर रोष व्यक्त करून विकासासाठी झटणाऱ्या कोल्हे कुटूंबियांवर विश्वास दाखवत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
विवेक कोल्हे म्हणाले की, धामोरी गावाने प्रत्येक निवडणुकीत मोठे मताधिक्य देऊन कोल्हे परिवाराला साथ दिली आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वांच्या साथीने आपण भरपूर यश मिळवू असा आशावाद व्यक्त करून गेल्या दोन वर्षात विरोधकांनी तालुक्यातल्या कुठल्याही समस्या सोडविल्या नाहीत,ठोस काम केले नाही, फक्त नौटंकी आणि प्रसिद्धी यातच वेळ घालवला आहे या धूळफेक करून आयत्या मंजूर कामांचे जाऊन छायाचित्रे काढणा-या फोटो सम्राटाच्या निष्क्रिय कारभाराला जनता कंटाळली आहे शेतीचे पाण्याचे रोटेशनचा खेळखंडोबा, अतिवृष्टी झाली तर कवडीचा मोबदला या सरकारच्या काळात मिळत नाहीये हे चित्र मनाला वेदना देणारे असल्याची टीका त्यांनी केली आहे .माजी मंत्री शंकरराव कोल्हे बिपीन कोल्हे व स्नेहलता कोल्हे यांनी सत्ता असो वा नसो नेहमीचं विकासाची कामे केली या विश्वासानेच लोक आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश करीत आहेत असे ते म्हणाले, नूतन प्रवेश करणाऱ्या सहकाऱ्यांचे त्यांनी स्वागत केले. विजय जाधव यांची महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या संचालकपदी फेरनिवड झाली त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. चौकट – आम्ही विरोधकांनी निवडून येण्यापुरते दिलेल्या खोट्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही त्यामुळे विरोधकांना झुगारून कोल्हे कुटूंबावरच्या विश्वासावर भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे व आगामी काळात सर्व निवडणूका बिपीनदादा कोल्हे, स्नेहलता कोल्हे व युवानेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ताकतीने जिंकणार असा विश्वास अविनाश आहिरे यांनी व्यक्त केला.





