निळवंडे शिर्डी कोपरगाव बंदिस्त पाणी योजना कार्यान्वित करा, सर्व  पक्षीय यांची मागणी

निळवंडे शिर्डी कोपरगाव बंदिस्त पाणी योजना कार्यान्वित करा, सर्व पक्षीय यांची मागणी

Nilwande Shirdi Kopargaon Implement closed water scheme, demand of all parties

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Mon 4 Oct 2021, 20:20Pm.

कोपरगाव : श्री साईबाबा शताब्दी वर्षानिमित्त मंजूर झालेली निळवंडे धरणातून बंद पाईपलाईनद्वारे अंतिम टप्प्यात असलेली श्री साईबाबा संस्थान शिर्डी शिर्डी नगरपंचायत व कोपरगाव शहर संयुक्त पाणीपुरवठा योजना तातडीने कारवाई करावी अशी मागणी कोपरगाव भाजपा सेना रिपाइं व मित्रपक्षांच्या वतीने श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानायत (धिवरे) यांच्याकडे सोमवारी(४) रोजी दुपारी शिर्डी येथे त्यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.

श्री साईबाबा संस्थानच्या व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानायत (धिवरे) यांच्या वतीने हे निवेदन प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे व प्रशासकीय अधिकारी तथा मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब शिंदे यांनी बाहेर येऊन स्वीकारले.

कोपरगाव शहराला वारंवार भेडसावणाऱ्या पिण्याच्या पाणी प्रश्नावर कायमस्वरूपी मार्ग काढण्याच्या दृष्टीने श्री साईबाबा शताब्दी वर्षानिमित्त निळवंडे धरणातून बंद पाईपलाईनद्वारे श्री साईबाबा संस्थान शिर्डी, शिर्डी नगरपंचायत व कोपरगाव शहर संयुक्त पाणीपुरवठा योजना तात्कालीन महाराष्ट्र सरकार व तात्कालीन श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाने मंजुरी दिली होती, देशविदेशातून लाखो भाविक दरवर्षी शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात या गर्दीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे काही वर्षांपूर्वी तीव्र पाणीटंचाईमुळे साईभक्तांना शिर्डीत दर्शनास येऊ नये असे आवाहन तत्कालीन विश्वस्त मंडळाला करावे लागले होते. कारण शिर्डी कोपरगाव शहराला सातत्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई नेहमी असते नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविण्यात कोपरगाव नगरपालिकेचे यंत्रणा अपयशी ठरत आहे या सर्व परिस्थितीचा विचार करून शिर्डी कोपरगाव शहराला दररोज शुद्ध व स्वच्छ पाणी मिळावे म्हणून सन २०१५ मध्ये कोपरगाव विधानसभा तात्कालीन आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे निळवंडे धरणातून शिर्डी परत येणारी बंद पाईपलाईन योजना पुढे कोपरगाव शहरापर्यंत देण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानुसार २० जुलै २०१५ सभागृहाने यास मान्यता दिली होती. त्यास श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाने २८ एप्रिल २०१७ च्या सभेमध्ये विषय क्रमांक २८० अन्वये सविस्तर चर्चेद्वारे निळवंडे शिर्डी पर्यंत येणारी पाईपलाईन पुढे कोपरगाव शहरासाठी अन्यये संदर्भात आवश्यक कारवाई करण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार ७ फेब्रुवारी २०१८ रोजी शासन निर्णय क्रमांक सहा सवी २०१५/१००७ प्र. क्र. १७७ (भाग -१)का.१६ अन्वये विधी व न्याय विभागाकडून वाढीव श्री साईबाबा संस्थान शिर्डी, नगरपंचायत शिर्डी, आणि कोपरगाव नगरपालिका संयुक्त पाणीपुरवठा योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आल्यानंतर ३ एप्रिल २०१८ रोजी संस्थांच्या वतीने वृत्तपत्रात ही निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. विशेष म्हणजे या योजनेच्या पाणी आरक्षण प्रस्ताव वासही मान्यता मिळालेली असून गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विभाग विकास महामंडळ औरंगाबाद च्या नियामक मंडळाच्या दिनांक १५ फेब्रुवारी २०१७ रोजी झालेल्या ६३ व्या बैठकीत मंजूर ठराव क्रमांक ६३/२ मा.अध्यक्ष गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ यांनी आदेश निर्गमित केलेले आहे. ही वस्तुस्थिती असताना त्या वेळेस राजकीय द्वेषापोटी योजनेसंदर्भात माननीय उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या, परंतु तत्कालीन पाणीटंचाई सर्व परिस्थितीचा विचार करून मा. उच्च न्यायालयाने ही योजना व्हावी, याबाबत सकारात्मक निर्णय दिलेला आहे. त्यामुळे सदर योजना मा. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ व माननीय कार्यकारी अधिकारी साहेब, श्री साईबाबा संस्थान शिर्डी यांनी कार्यान्वित करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू केल्यास या योजनेचे काम पूर्ण होऊ शकते असे निवेदनात म्हटले आहे, तरी शिर्डी कोपरगाव शहरातील नागरिकांचा देश-विदेशातून येणार्‍या साईभक्तांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सूटण्याच्या दृष्टीने निळवंडे धरणातून बंदिस्त पाईपलाईन ने शिर्डी व कोपरगाव करता असलेली संयुक्त पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने आपण योग्य ती कारवाई राबवावी अशी विनंतीही या निवेदनात करण्यात आली आहे. श्री साईबाबा संस्थानच्या व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वतीने हे निवेदन प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे व प्रशासकीय अधिकारी तथा मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब शिंदे यांनी बाहेर येऊन स्वीकारले या निवेदनावर भाजपाचे उपनगराध्यक्ष आरिफ कुरेशी, अमृत संजीवनी चे चेअरमन पराग संधान, सेना उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, शिवसेना गटनेते योगेश बागुल, शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष संजय सातभाई,शिवसेना नगरसेवक अतुल काले, माजी शहरप्रमुख सनी वाघ, सिद्धार्थ शेळके भाजप शहराध्यक्ष दत्ता काले, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, भाजप नगरसेवक सत्येन मुंदडा, नगरसेवक शिवाजी खांडेकर नगरसेवक विजय वाजे, नगरसेवक स्वप्निल निखाडे, माजी नगरसेवक बबलू वाणी, रिपाईचे तालुकाध्यक्ष जितेंद्र रणशूर, शरद त्रिभुवन, विनोद राक्षे, मनसेचे बापु काकडे , बापू पवार, संदीप देवकर, पप्पू पडियार, रंजन जाधव, जपे, आदींच्या सह्या आहेत. 

Leave a Reply

You cannot copy content of this page