शिवसेना भाजप गटनेत्यांनी दोन विषय रद्द करून केली पालिकेची तीन कोटींची बचत
Shiv Sena BJP group leaders saved Rs 3 crore by canceling two subjects
शिवसेनेच्या नगरसेवकांनी नगरसेवक स्थानिक निधीतून समाज मंदिरांसाठी दिली प्रत्येकी पाच पाच लाखाची मदत !Shiv Sena corporators donated Rs 5 lakh each from local funds for Samaj Mandir
नगरपालिका सर्वसाधारण सभा: २६ विषयांना मंजुरी, करवाढीच्या विषयाला स्थगिती ! नागरिकांना दिलासा Municipal General Meeting: Approval of 26 issues, postponement of tax increase! Consolation to the citizens
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Wed 6 Oct 2021,16:30Pm.
कोपरगाव : कोपरगाव नगरपालिकेची मंगळवारी (५) रोजी दुपारी ऑनलाईन सर्वसाधारण सभा पार पडली, खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या सभेत एकूण २७ विषय होते पैकी विषय क्रमांक १६ करवाढीच्या विषयाला स्थगिती देण्यात आलेली असून बाकी सर्व विषय मंजूर करण्यात आले आहेत. अशी माहिती नगरसेवकांनी दिली.
मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत एकूण २७ विषय होते पैकी सभेतील विषय क्रमांक २५ गटनेते योगेश बागुल व भाजपा गटनेते रवींद्र पाठक यांनी दोन विकास कामे रद्द व्हावी असा अर्ज दिला होता, यात बहुचर्चित २८ विकास कामापैकी एस. जी. विद्यालय, गुरुद्वारा रोड व अण्णाभाऊ साठे ते येवला नाका रोड या तीन रस्त्यांसाठी अंदाजपत्रकात दाखविलेला अनावश्यक खर्च काढून टाका अशी मागणी केली होती त्यामुळे साधारण दीड कोटी रुपये वाचणार आहेत, तर प्रभाग क्रमांक ५ मधील ८५ लाखाची गटार व प्रभाग क्रमांक ३ मधील तुळजाभवानी मंदिर ते राम टायर या ६८ लाखाच्या खडीकरण या रस्त्याची काहीही गरज नसल्यामुळे तो रद्द करावा असे अर्जात नमूद केले होते, त्यामुळे हे दीड कोटी रुपये वाचणार आहेत हे दोन्ही विषय मंजूर झाल्यामुळे पालिकेचे सुमारे ३ कोटी रुपयांची बचत होणार आहे. असा दावा या दोन्ही गटनेत्यांनी केला आहे.
तर विषय क्रमांक २२ वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत वैशिष्ट अंतर्गत ५ कोटी निधीची कामे आली होती, यात प्रभाग क्रमांक ५ मधील सुवर्णकार नरहरी समाजमंदिर व संत सेना नाभिक समाजमंदिर यासाठी दहा लाख प्रत्येकी दहा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होत. परंतु ही समाजमंदिरे मोठी असल्याचे सांगत या प्रभागातील शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक गटनेते योगेश बागुल व शिवसेना नगरसेविका सौ. ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई या दोघांनी प्रत्येकी आपल्या स्थानिक नगरसेवक निधीतून प्रत्येकी पाच- पाच लाख रुपये वाढवून दिले आहेत त्यामुळे आता या दोन्ही मंदिरांना प्रत्येकी पंधरा- पंधरा लाख रुपये मिळणार आहेत अशी माहिती शिवसेना गटनेते योगेश बागुल यांनी दिली आहे. कोपरगाव शहरात नगरसेवकांनी आपल्या स्थानिक निधीतून पहिल्यांदाच अशा प्रकारची भरघोस मदत केली आहे याचे सर्वत्र स्वागत होत आहे.
मंगळवारी (५) रोजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या अध्यक्षतेखाली व नवे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या उपस्थितीत ऑनलाइन झालेल्या सर्वसाधारण सभेतील २७ विषयांपैकी विषय क्रमांक १ मागील प्रोसिडिंग वाचन, २ ते १० वा नगरपालिका कर्मचारी वारसांना सेवेत घेणे, विषय ११ व १२ सेवेत घेणे व अनुकंपा तत्वावर सेवेत घेणे हे विषय होते. तर विषय क्रमांक १३ एकात्मिक बाल संरक्षण योजना अंतर्गत नगर बाल विकास समिती स्थापन करणे विषय क्रमांक १४ वसुंधरा अभियानांतर्गत विविध कामासाठी तज्ञ एजन्सीची नेमणूक करणे, विषय क्रमांक १५ वसुली विभागासाठी इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन उभारणाऱ्या नागरिकांना मालमत्ता करातून सूट देणे, विषय क्रमांक १६ कर आकारणीसाठी गुणांक निश्चित करणे, विषय क्रमांक १७ कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगातील दुसरा हप्ता देणे, विषय क्रमांक १८ पालिका इमारत विद्युत फिटिंग करणे, विषय क्रमांक १९ नवीन झाडे खरेदी करणे झाडे लावणे जाळी लावणे आधी, विषय क्रमांक २० दिशादर्शक फलक लावणे, प्रभागनिहाय ऑफिस उभारणे, घंटागाडी, विषय क्रमांक २१ विविध योजनेतील रस्ते व विकास कामे करणे, विषय क्रमांक २२ वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी अनुदान योजना व विकास कामे करणे, विषय क्रमांक २३ सुवर्ण जयंती नगरोत्थान अंतर्गत स्मशानभूमी गॅस शवदाहिनी करणे, विषय क्रमांक २४ शहरातील अतिक्रमणे काढणे विषय क्रमांक २५ शिवसेना गटनेते योगेश बागुल व भाजपा गटनेते रवींद्र पाठक यांनी दोन विकास कामे रद्द करणेबाबत दिलेल्या अर्जावर विचार विनिमय करणे, विषय क्रमांक २६ सन्माननीय नगरसेवकांच्या आलेल्या अर्जावर विचार विनिमय करणे, तर विषय क्रमांक २७ आयत्या वेळी आलेल्या विषयावर चर्चा करणे असे होते. आयत्या वेळेचे विषय मात्र समजू शकले नाही.