व्हॉट्‌सऍप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली? दोन जणांवर गुन्हा दाखल

व्हॉट्‌सऍप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली? दोन जणांवर गुन्हा दाखल

सायबर क्राईम
वृत्तवेध ऑनलाइन 11 July 2020

कोपरगाव : व्हॉट्‌सऍप ग्रुपवर मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या, प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दोन जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मोबाईल क्रमांक ९९७५०९८१४७ वापरणारा माधव गुरूजी व व्हॉट्‌सऍपग्रुपचे ॲडमिन  बाबुभाई अब्दुलभाई सय्यद राहणार संजीवनी गेटसमोर, शिंगणापूर तालुका कोपरगाव अशी आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, “संजीवनी ग्रुप’मध्ये सदस्य असणाऱ्या मोबाईल क्रमांक ९९७५०९८१४७ वापरणारा माधव गुरूजी याने रसूल का चरित्र part6 हे नाव असलेल्या व्हिडिओ मध्ये मुस्लीम धर्माविरुद्ध अपशब्द वापरून आक्षेपार्ह
व्हिडिओ क्लिप प्रसारित करून फिर्यादी व मुस्लिम धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या, तसेच आरोपी क्रमांक दोन बाबुभाई अब्दुलभाई सय्यद याने मुस्लिम धर्मियांच्या धार्मिक भावना दुखविणारी अाक्षेपार्ह व्हिडिओ तात्काळ डिलीट करणेबाबत आरोपी क्रमांक एक याला यांना सूचना दिली नाही, त्यांना ग्रुप मधून काढून टाकले नाही, तसेच   आक्षेपार्ह व्हिडिओ बाबत पोलीस स्टेशनला माहिती दिली नाही, व्हाट्सअप ग्रुप वर नियंत्रण न ठेवता निष्काळजीपणा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी आय्युब कादरभाई शेख (५८) एकता कॉलनी, बैल बाजार रोड, कोपरगाव. यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून दोन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ बाबुभाई अब्दुलभाई सय्यद या आरोपीस अटक केली.

पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो. स. ई. भारत नागरे करीत आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page