कोपरगाव दुसऱ्यांदा कोरोना मुक्त ; कोवीड सेंटर रिकामं!
कोरोनामुक्त व संशयित अशा २१ जणांना डिस्चार्ज
कोपरगाव कोरोना अपडेट :
२२९ तपासण्या, १३ जण कोरोना ग्रस्त, १२ जण कोरोनामुक्त, तर एका महिलेचा मृत्यू, २१६ अहवाल निगेटिव्ह
वृत्तवेध ऑनलाइन 11 जुलै 2020
कोपरगाव: कोरोनामुक्तासह संशयितांना डिस्चार्ज दिल्याने पंधरा दिवसापासून गजबजलेलं कोपरगाव कोवीड सेंटर शनिवारी एकदम रिकामं झाल्याने सुन…सुन ..वाटत होते.
गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एक डॉक्टर कुटुंब व मुंबईचा पाव्हणा हे आठजण कोरोनाग्रस्त झाल. यांच्या संपर्कात आलेल्या कोरोना संशयितांची यादी ५० संख्या पर्यंत पोहोचल्याने सद्गुरू गंगागिरी महाराज कॉलेज मधील मुलींच्या वस्तीगृहातील कोरोना सेंटर मध्ये दाखल केल्याने येथे एकदम रुग्णांची वर्दळ वाढली होती. कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर, विशेष अधिकारी डॉ. वैशाली बडदे, डॉ. संतोष विघाटे यांच्या कामाचा व्याप वाढला होता ते रुग्णांवर २४ तास लक्ष ठेवून होते.
शनिवारी (११जुलै) रोजी तालुक्यातील प्रलंबित असलेल्या १३ जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. या सर्व जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून आठजण कोरोनामुक्त झाल्याने आजपर्यंत या सर्व २१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे कोपरगाव येथील कोविंड सेंटर शनिवारी रिकामं झाला आहे, यामुळे आज तरी कोपरगाव दुसऱ्यांदा संपूर्णतः कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.