मतदानाबरोबरच रक्तदानाची सुरुवात केली – विवेक कोल्हे
६० वेळा रक्तदान करणाऱ्या पिताश्री बिपिनदादा कोल्हे यांची प्रेरणा
वृत्तवेध ऑनलाइन : 11 जुलै 2020
कोपरगाव : शिक्षण घेण्याच्या वयात रक्तदान करण्याची भावना मनात उत्पन्न झाली, ती आज सामाजिक कार्य करताना कर्तव्य बनले आहे. वयाच्या अठराव्या वर्षी लोकशाहीने मतदानाचा अधिकार दिला, त्याच वेळी सामाजिक जबाबदारी समजून आपण रक्तदानाची सुरुवात केली, अर्थात यामागे आजपर्यंत ६० वेळा रक्तदान करणाऱ्या पिताश्री बिपिनदादा कोल्हे यांची प्रेरणा असल्याचे प्रतिपादन संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक बिपीन कोल्हे केले. गेल्या ५ वर्षापासून देश भक्तीचे प्रतीक असलेले “रक्तदान महादान” हे कार्य सुरू आहे असेही ते म्हणाले.
जेऊर कुंभारी येथील शिवसूत्र युवा प्रतिष्ठान च्या सातव्या वर्धापन दिनी आयोजित रक्तदान शिबिरात विवेक कोल्हे बोलत होते.
विवेक कोल्हे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेले नियम पाळून तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील शिवसुत्र युवा प्रतिष्ठान काम करत आहे .एखांदी संघटना स्थापन करणे खूप सोपे आहे मात्र ती टिकवणे तेवढेच अवघड मात्र ठराविक संघटना अशा आहेत की त्या मनाला भिडून जातात त्यात शिवसुत्र युवा प्रतिष्ठान आहे . सामाजिक कामात जातीपाती धर्म विसरून ही संघटना काम करते. गेल्या सात वर्षापासून प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त प्रत्येक सदस्य रक्तदान शिबिरात आपले रक्तदान करतो. ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे.
यावेळी कोल्हे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब वक्ते, संचालक शिवाजी वक्ते, भिमराज वक्ते, आरपीआयचे दिपक गायकवाड, पोलीस पाटील बाळासाहेब गायकवाड, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुधाकर वक्ते, जालिंदर चव्हाण, संचालक ज्ञानेश्वर परजणे, मुकुंद काळे ,आनंदराव चव्हाण, सोपानराव वक्ते, कोंडीराम वक्ते,अशोक राऊत, रमेश गुरसळ, काशिनाथ वक्ते, भानुदास वक्ते,प्रा.मधुकर वक्ते, बाळासाहेब सोळके, तुषार गुरसळ, शरद चव्हाण, प्रकाश वक्ते, शशिकांत वक्ते, योगेश जगताप, कैलास चव्हाण,नामदेव वक्ते, किशोर गायकवाड, राहुल चव्हाण, राहुल वक्ते, तसेच शिवसुत्र युवा प्रतिष्ठाणचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुधाकर वक्ते यांनी केले. भीमराज वक्ते, बाळासाहेब वक्ते ,शिवाजी वक्ते ,दिपक गायकवाड, जालिंदर चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले
प्रतिष्ठानने विद्यार्थी दत्तक योजना ,वृक्षारोपण, पाणपोही, आजारपणासाठी मदत ,रक्तदान शिबिर आदी उपक्रम यशस्वीपणे पूर्ण करून सामाजिक व धार्मिक कार्यातही हे प्रतिष्ठान पुढे असते.