४० वर्षे सत्ता तुमची असताना प्रश्न आम्हाला का विचारता? – सुनील गंगुले

४० वर्षे सत्ता तुमची असताना प्रश्न आम्हाला का विचारता? – सुनील गंगुले

Why do you ask us questions when you have been in power for 40 years? – Sunil Ganguly

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Wed13 Oct 2021,17:40Pm.

कोपरगाव : ४० वर्ष सत्ता असताना रोजगार वाढीसाठी कोणते दिवे लावले हे अगोदर सांगा. निळवंडेचे गाजर दाखवून नागरिकांची दिशाभूल करू नका, सत्ता तुमची असताना प्रश्न आम्हाला का विचारता? असा सवाल राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांना प्रसिद्धी पत्रकातून केला आहे.

आ.आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून एन. एच. ७५२ जी रस्त्यासाठी १५० कोटी रुपये, १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालय, बाबतीत देखील श्रेय घेण्याचा त्यांचा प्रयत्न फसल्याच्या नैराश्यातून विवेक कोल्हे आरोप करीत असल्याची टीका गंगुले यांनी केली. कोपरगाव शहरातील नागरिकांना पाणी पाहिजे ते पाणी दारणेतून येऊ द्या, नाहीतर निळवंडेतून येऊ द्या , पाणी महत्वाचे आहे. त्यामुळे पाणी कुठूनही आले तरी चालेल मात्र गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असतांना ते पाणी का मिळू शकले नाही? याचे उत्तर अगोदर दिले पाहिजे. आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्याच्या माथ्यावर फोडून तुमचे अपयश अजिबात झाकले जाणार नाही. शहरातील नागरिकांना नियमित पाणी पुरवठा साठवण क्षमता नसल्यामुळे होत नाही त्यासाठी पाच नंबर साठवण तलावाचे काम व्हावे यासाठी आ.आशुतोष काळे यांनी सत्ता नसतांना देखील संघर्ष केला व सत्ता मिळताच या पाच नंबर साठवण तलावाचे काम मार्गी लावले आहे. याउलट आपण सत्ता असतांना देखील पाच नंबर साठवण तलाव होऊ नये म्हणून काय प्रयत्न केले हे देखील शहरवासीय जाणून आहेत. तुमच्याकडे ४० वर्षापासून सत्ता होती तर शहराच्या पाण्याचा प्रश्न भिजत कोणी ठेवला याचे उत्तर एकदा आपल्या मनाला विचारा. मात्र निवडणुकीच्या तोंडावर जनतेची दिशाभूल न करता आपली पाण्याची दुकानदारी आता बंद करा असा टोला गंगुले यांनी कोल्हे यांना लगावला.

Leave a Reply

You cannot copy content of this page