कोपरगावात  फटाके विक्रीचा मार्ग मोकळा  

कोपरगावात  फटाके विक्रीचा मार्ग मोकळा  

Clear the way for selling firecrackers in Kopargaon

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu14 Oct 2021,16:00Pm.

कोपरगाव :  माझी वसुंधरा अभियानांतर्गत फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यासाठी नगरपालिकेमध्ये विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली या सभेत नगरसेवकांनी एकमताने हा विषय तहकूब ठेवला आहे. त्यामुळे कोपरगावात  फटाके विक्रीचा मार्ग मोकळा झाला  आहे.

दिल्लीत फटाक्यांच्या विक्रीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्यानंतर महाराष्ट्रातही फटाक्यांवर संक्रांत आली आहे. ‘सुरक्षेच्या कारणास्तव’  फटाके विक्रीसंबंधी सुप्रीम कोर्टाने सोमवारी दिलेल्या आदेशांचे राज्यातही पालन करावे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही कोर्टाने यंत्रणेस दिले होते.  
त्यात कोपरगाव नगरपालिकेने माझी वसुंधरा अभियानांतर्गत  फटाके   वापर व  विक्रीवर बंदी घालणेबाबत गुरूवारी (१४) रोजी सकाळी  ऑनलाइन  विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली या सभेत सर्व नगरसेवकांनी एकमताने हा विषय तहकूब ठेवला आहे.
आधीच कोरोनामुळे लहान-मोठे व्यावसायिक त्रस्त झाले आहे. त्यात  ऐन दिवाळीच्या तोंडावर फटाक्यांच्या विक्रीवर बंदीचे गडांतर येणार म्हणून फटाके विक्रेते हवालदिल झाले होते मात्र सर्व नगरसेवकांनी एकमताने हा विषय  तहकूब  ठेवला. 
त्यामुळे  दिल्ली आणि केंद्र सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे नाराज़ झालेल्या फटाका 
विक्रेत्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसुन येत आहे.  फटाके विक्रीस परवानगी मिळावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली होती. 

कोट

जर फटाके फोडण्यावर बंदी आणी तरूंग व दंडच लावायचा आहे.  जर हेच सर्व करायचे असेल तर भरपूर शुल्क घेऊन फटाके बनवून विक्री करणार्‍यांना लायसन्स का देण्यात येते आहे. शेकडो कुटुंबांचे उदरनिर्वाह का बंद ठेवले जात आहे. ” असे फटाके विक्रेते सांगतात.

चौकट

विदेशी फटाक्यांची विक्री करणे भोवणार

भारतात विदेशी फटाकेविक्री, तसेच साठवणूक करण्यास बंदी आहे. मात्र, तरी दर वर्षी दिवाळीच्या काळात चिनी बनावटीचे फटाके बाजारात विक्रीसाठी येतात.त्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्य सरकारने संबंधित यंत्रणांना  दिले आहेत.हेही लक्षात घेतले पाहिजे.

Leave a Reply

You cannot copy content of this page