तरूणाचा शिवसेनेत प्रवेश; पक्षाची ताकद वाढणार -राजेंद्र झावरे

तरूणाचा शिवसेनेत प्रवेश; पक्षाची ताकद वाढणार -राजेंद्र झावरे

Youth’s entry into Shiv Sena; The strength of the party will increase – Rajendra Zaware

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu14 Oct 2021,17:30Pm.

कोपरगाव : शहरातील इंदिरानगर भागातील तरूण कार्यकर्त्यांच्या शिवसेनेत प्रवेशाने या प्रभागात पक्षाला निश्चित ऊर्जा मिळणार असून, या भागातील विकासकामांसाठी पक्ष या कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी सांगितले.

राहुल काळे,अमोल मेहेरे,चंदन मोहरे, प्रतीक पगारे,मंगेश मरसाळे, शिवाजी ससाणे,विलास भालेराव,दादू खोदकर, आकाश सोलसे,रोहित खंडांगळे,नाना नेटारे,पवन साटोटे या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी श्री. झावरे बोलत होते.

यावेळी शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल, विधानसभा संघटक अस्लम शेख, माजी शहरप्रमुख भरत मोरे जिल्हाप्रमुख वा. से. इरफान शेख ,विकास शर्मा, आकाश कानडे बाळासाहेब सांळुके वैभव गिते विशाल झावरे,विक्रांत झावरे,ऋषीकेष पवार, अमित भास्कर, वैभव हलवाई, राहुल देशंपाडे,राहुल हसंवाल,सतिष शिंगाणे, मंगेश देशमुख योगेश उशिरे आदी उपस्थित होते.

या वेळी बोलताना राजेंद्र झावरे म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या संकल्पनेनुसार शिवसेनेचे काम चालते. तरूण कार्यकर्त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे त्या त्या प्रभागात शिवसेनेची ताकद अधिक बळकट होण्यास मदत झाली. पक्षाच्या माध्यमातून त्यांना ताकद देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.’’

Leave a Reply

You cannot copy content of this page