कोपरगाव पिपल्स  बँकेकडून सभासदांना १५ टक्के लाभांश वाटप

कोपरगाव पिपल्स  बँकेकडून सभासदांना १५ टक्के लाभांश वाटप

Kopargaon People’s Bank distributes 15% dividend to its members

सभासदांनी मानले बँकेचे आभारThe members thanked the bank

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu14 Oct 2021,18:30Pm.

कोपरगांव : जिल्हयातील अग्रगण्य असलेल्या कोपरगांव पिपल्स बॅकेचे सभासदांना १५ टक्के प्रमाणे लाभांशाचे वितरण बॅंकेचे संचालक व सभासदांचे उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी बॅंकेचे सभासद मनमोहन गुजराथी, कांतीलाल जोशी, बाळासाहेब पांढरे, ॲड . वसंतराव कपीले, रसिकचंद कोठारी हे उपस्थित होते.

बॅंकेचे सर्व कर्मचारी, संचालक मंडळ, चेअरमन यांनी खर्चात बचत करुन, काटकसरीचे धोरण अवलंबुन बॅंकेची नफा क्षमता वाढविली आहे. बॅंक थकबाकीदार सभासदांनाही सन्मानाने वागणूक देउन व कायदेशीर कारवाई न करताही योग्य प्रकारे वसुली करीत आहे हेच या बॅंकेचे वैशिष्टय आहे.

बॅंकेचे जेष्ठ संचालक कैलास ठोळे म्हणाले, ३१ मार्च, या वर्षाअखेरीस बॅंकेचे वरीष्ठ अधिकारी वर्ग हे कोविड ने आजारी असल्याने व हाॅस्पीटलमध्ये  उपचार घेत  असतांनाही बॅंकेचे तत्कालीन चेअरमन अतुल काले यांनी सर्व संचालक व सेवकांचे मदतीने कर्ज वसुलीवर भर देउन बॅंकेचा एनपीए सात टक्केचे आत राखण्यात यश मिळविले, बॅंकेचे अधिकारीही हाॅस्पीटलाईज असतांना त्यांनी बॅकेशी सतत संपर्क ठेवुन बॅंकेचे वसुलीवर लक्ष केंद्रीत केले.

अध्यक्ष सत्येन मुंदडा यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले व सर्व सभासदांच्या विश्वासामुळेच बॅक प्रगतीपथावर आहे, असे सांगीतले. तसेच सर्व सभासदांचा लाभांश त्यांचे खातेत वर्ग झाला असल्याची माहिती दिली.

यावेळी डाॅ. विजय कोठारी, सुनिल कंगले, अतुल काले, सुनिल बंब, वसंतराव आव्हाड, यशवंत आबनावे, हेमंत बोरावके, ॲड संजय भोकरे, सेवक प्रतिनिधी विरेश पैठणकर, अशोक पापडीवाल, जनरल मॅनेजर दिपक एकबोटे, असि. जनरल मॅनेजर जितेंद्र छाजेड उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page