आ. काळेंमुळे उजनी चारी उपसा जलसिंचन योजना पुन्हा सुरु – राहुल रोहमारे
Come on. Ujani Chari Upsa Irrigation Scheme resumed due to blackout – Rahul Rohmare
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sat16 Oct 2021,18:00Pm.
कोपरगाव : उजनी चारी उपसा जलसिंचन योजना २०१४ पर्यंत माजी आमदार अशोकराव काळे यानी त्यांच्या कार्यकाळात त्यांनी पदरमोड करून हि योजना चालविली. मात्र २०१४ पासून हि योजना बंद असलेली हि योजना आ. आशुतोष काळे यांनी सलग दुसऱ्या वर्षी सुरु केली असल्याची माहिती राहुल रोहमारे यांनी दिली आहे.
२०१४ पासून बंद असलेली उजनी चारी उपसा जलसिंचन योजना पुन्हा सुरु करून आ. आशुतोष काळे यांनी या भागातील नागरिकांना दिलासा दिला होता. त्यामुळे या परिसरात शेती व पिण्याच्या पाण्याची जाणवणारी टंचाई दूर झाली आहे. माजी आमदार अशोक काळे प्रमाणे स्वत: या योजनेचे थकलेले वीजबिल भरले आहे.दसऱ्याच्या दिवशी या योजनेचे अध्यक्ष बाबुराव थोरात यांच्या हस्ते इलेक्ट्रिक वीजमोटारी सुरु करून उजनी चारी उपसा जलसिंचन योजना सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेवर अवलंबून असणाऱ्या रांजणगाव देशमुख, जवळके, धोंडेवाडी, वेस, सोयगाव, अंजनापूर, बहादरपूर, मनेगाव आदी गावातील व परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
चौकट :- उजनी चारी उपसा जलसिंचन योजना कायमस्वरूपी कार्यान्वित ठेवण्यासाठी आ.आशुतोष काळे सक्षम असून इतरांनी आता आपली लुडबुड थांबवावी – बाबुराव थोरात (अध्यक्ष- उजनी चारी योजना).





