पक्ष आणि नेत्याचे काम महिलाच किचनपर्यंत जाऊन पोहोचवु शकतात- आशुतोष काळे

पक्ष आणि नेत्याचे काम महिलाच किचनपर्यंत जाऊन पोहोचवु शकतात- आशुतोष काळे

Only women can take the work of the party and the leader to the kitchen – Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Mon18 Oct 2021,13:20Pm.

कोपरगाव : महिला म्हणून तुम्ही फक्त घरामध्ये हॉलमध्ये नाहीतर थेट किचनपर्यंत पोहोचू शकता व समोरच्या महिलेला पक्ष, उमेदवार आणि पदाधिकारी यांनी काय केले ? आणि काय करणार आहे ? ते किचन पर्यंत जाऊन महिलेपर्यंत पोचविण्याचे काम महिलाच करू शकतात. असे गौरवोद्गार आमदार आशुतोष काळे यांनी गौतम बँकेच्या प्रांगणातील राष्ट्रवादी काँग्रेस महिला पद वितरण समारंभ प्रसंगी अध्यक्षपदावरून बोलताना व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित महिला पदाधिकारी

आशुतोष काळे म्हणाले परिसरात निवांत वेळी चार चौघी एकत्र आल्या तर जो संवाद आणि चर्चा महिला एकमेकीत करू शकतात ते पुरूष म्हणून पदाधिकारी असो की कार्यकर्ता तिथे येऊन बोलू शकत नाही थोडक्यात काय तर महिला म्हणून आपण जे करू शकता, हे आपणच करू शकता, जे पुरुष करू शकतात ते पुरुषच करू शकतो, महिलांचे प्रश्‍न महिलाच समजू शकतात, महिलांना अशा अनेक परिस्थितीतून जावं लागतं ज्याचा सामना पुरुषांना कधीच करावा लागत नाही. अशा परिस्थितीत महिलांना स्वत: सर्व सहन करावं लागतं, शहर असो की ग्रामीण विशेषत: पाणी प्रश्न हा महिलांच्या जीवना भोवती फिरत असतो कोपरगाव शहरामध्ये प्रत्येकाच्या घरासमोर पाणी साठविण्यासाठी चार ते पाच पाण्याच्या अतिरिक्त टाक्या दिसून येतात, पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाहुण्यांच्या येण्याजाण्याचे ठरविले जाते. हे चित्र बदलावे लागणार आहे. यासाठी पाण्यावरच लक्ष केंद्रित करावे लागणार आहे असे ते म्हणाले
प्रियदर्शनी महिला मंडळाच्या माध्यमातून गेले कित्येक वर्षापासून सौ पुष्पाताई काळे व सौ. चैताली काळे या महिला बचत गटाचे काम करीत आहेत. या अनुषंगाने त्यांनी गोदाकाठ महोत्सवाच्या निमित्ताने महिलांसाठी व्यावसायिक व्यासपीठ निर्माण करून दिले आहे, तर जागर स्त्री शक्तीचा नवरात्राच्या निमित्ताने सांस्कृतिक व सामाजिक व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. महिलांचे प्रश्‍न महिलाच समजू शकतात म्हणून महिलांनी प्रश्न मांडण्यासाठी पुढे आले पाहिजे महिलांसाठी असलेल्या सामाजिक व व्यावसायिक उपक्रमांमध्ये भाग घेतला पाहिजे, आपली बाजू मांडली पाहिजे, शासन दरबारी असलेल्या अडचणीमध्ये मी व पदाधिकारी मदत करतील. अशी ग्वाही देतो, आज पदाच्या माध्यमातून मिळालेली जबाबदारी पार पाडताना आधी प्रपंच सांभाळा, पण प्रपंचातून रोज एक तास वेळ काढा, सामाजिक कामात वेळ द्या, अशी विनंती करतो. नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन व त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा

यावेळी सुनील गंगुले म्हणाले, ही असत्याबरोबर सत्याची लढाई असून आमदार आशुतोष काळे यांनी केलेली कामे घराघरात पोचवायचे,अस्तित्वाची लढाई आहे,आ. आशुतोष काळे हे आपल्यासाठी लढत आहे, त्यांना साथ देणे आपले कर्तव्य आहे. त्यांनी कितीही निधी आणला तरी ते काम शहरात करावयाचे असल्यास पालिकेची संम्मती लागते, तेंव्हा शहर विकासासाठी पालिकेतही आपली सत्ता असावी, गेल्या पंचवीस तीस वर्षापासून सातत्याने नगरसेवक होणाऱ्यांना पारंपारिक नगरसेवकांना धडा शिकवा, दोन वर्षात आशुतोष काळे यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांना साई संस्थानची जबाबदारी सोपवली आहे. साई संस्थानच्या अध्यक्षीय पदाच्या माध्यमातून स्वर्गीय जयंतराव ससाणे यांनी श्रीरामपूरचा विकास केला त्याच अनुषंगाने कोपरगावकरांना दररोज पाणी ही आपल्यालाही विकास करण्याची संधी मिळाली आहे असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्ष सौ.प्रतिभा शिलेदार सौ. नरोडे, वैशाली आभाळे नगरसेविका मंगला वाकचौरे, यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी कार्यक्रमास धरमशेठ बागरेचा नगरसेवक मंदार पहाडे,मेहमूद सय्यद
सुनील बोरा, नगरसेविका वर्षा गंगुले, राष्ट्रवादी कॉंग्रेस पदाधिकारी महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रमेश गवळी यांनी केले, तर शेवटी आभार सौ. रेखा जगताप यांनी मानले.

चौकट
कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पालिकेच्या साठवण व्यवस्थेबरोबरच वितरण व्यवस्थेसाठी योजना तयार केली असून यासाठी निधी मिळावा म्हणून पाठपुरावा सुरू आहे, लवकरच ही गोड बातमी आपल्याला देणार आहे- आ. आशुतोष काळे

Leave a Reply

You cannot copy content of this page