बहादराबाद ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाच्या श्रीमती संगिता पाचोरे
Mrs. Sangita Pachore of Kolhe Group as Deputy Panch of Bahadurabad Gram Panchayat
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu 21 Oct 2021,20:20Pm.
कोपरगाव : येथील बहादराबाद ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाच्या श्रीमती संगिता आण्णासाहेब पाचोरे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली त्याबद्दल जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
श्रीमती संगिता पाचोरे यांच्या नावाची सुचना श्गोवर्धन पाचोरे यांनी मांडली त्यास श्रीमती. लिलावाती पाचोरे यांनी अनुमोदन दिले, मावळत्या उपसरपंच श्रीमती शिलाबाई पाचोरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
सरपंच विक्रम पाचोरे यांनी युवा नेते बिपीन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीने केलेल्या कामाची माहिती देऊन प्रस्तावित कामांचा लेखाजोखा मांडला. यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच श्रीमती संगिता पाचोरे यांचा सत्कार करण्यात आला. आभार नितिन पाचोरे यांनी केले,
यावेळी ग्रामसेवक श्रीमती अनिता दिवे, सदस्य गोवर्धन पाचोरे, श्रीमती लिलावती पाचोरे, पोलिस पाटील, आप्पासाहेब पाचोरे, दत्तुभाऊ पाचोरे, आण्णासाहेब पाचोरे, राजेंद्र पाचोरे, बाळासाहेब पाचोरे सोमनाथ पाचोरे, अरूण पाचोरे, बंडू पाचोरे,श्री निलेश पाचोरे, आकाश पाचोरे, ग्रामपंचायत कर्मचारी प्रविण घारे, अशोक सरवार आदी उपस्थित होते.





