खरीपाची नुकसान भरपाई मिळावी ; आ. काळेंची ना. मुश्रीफांकडे मागणी
Kharif losses should be compensated; Come on. A. Kale . Demand to Na. Mushrif
कोपरगाव : विधानसभा मतदार संघात परतीच्या पावसाने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्याकडे आढावा बैठकीत केली आहे.
या बैठकीत आ. आशुतोष काळे यांनी परतीच्या पावसामुळे सोयाबीन, मका, कांदा रोपे तसेच भाजीपाला पिकांच्या झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती देवून भरपाईची मागणी केली.तसेच मतदार संघाच्या विविध प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले , महाविकास आघाडी सरकारने मागील दोन वर्षात कोपरगाव मतदार संघातही वेळोवेळी मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळाली आहे. आताही लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी या आ. आशुतोष काळे यांच्या मागणीला ना.हसन मुश्रीफ यांनी सकारात्मक प्रतिसाद देत भरपाई देण्याचे आश्वासन दिले. या बैठकीसाठी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद अध्यक्षा.ना.सौ. राजश्री घुले, पोलीस अधीक्षक डॉ. मनोज पाटील,मदत व पुनर्वसन विभागाचे अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.