एस.जे.एस हॉस्पिटलमध्ये २०० रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया-डॉ. भाग्यश्री जोशी
Free surgery on 200 patients at SJS Hospital-Dr. Bhagyashree Joshi
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sat 23 Oct 2021,18:28Pm.
कोपरगाव : तालुक्यातील कोकमठाण येथील श्री. जनार्दन स्वामी हॉस्पिटल मध्ये गेल्या दोन महिन्यात सुमारे २२ हृदय शस्त्रक्रिया तर १७५ एन्जोग्राफी व एन्जोप्लास्टी अशा २०० शस्त्रक्रिया व मोफत उपचार करण्यात आले. अशी माहिती प्रशासनाच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक डॉ. भाग्यश्री जोशी यांनी दिली.
गेल्या काही महिन्यात हॉस्पिटलमध्ये नव्याने सुरू झालेल्या हृदय शस्त्रक्रिया, ऍन्जिओग्राफी व एन्जोप्लास्टी हि उपचार पद्धती सुरु करण्यात आली आहे. हॉस्पिटल मधील उपलब्ध आधुनिकी यंत्रसामग्री तसेच तज्ज्ञ डॉक्टराच्या माध्यमातून दोनच महिन्यात वरील तीनही प्रकारच्या सुमारे दोनशे हुन अधिक शस्त्रक्रिया यशस्वी रित्या पार पडल्या आहे. गामीण भागात गरजवंतांना मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरातील दवाखान्यात जाऊन उपचार घेणे शक्य नसल्याचे लक्षात घेऊन श्री. जनार्दन स्वामी हॉस्पिटल यांनी रुग्णांची हॊणारी गैरसोय लक्षात घेऊन कोपरगाव सारख्या ठिकाणी हि सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्याने येथील अनेक रुग्णांना दिलासा मिळाला आहे. मोठ्या शहरातील उपचार आपल्या परिसरात होत असल्याने अनेक रुग्णांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. परिसरातीलच नवे तर संपूर्ण महाराष्ट्रातून रुग्णांची रेलचेल या ठिकाणी सुरु आहे. या हृदय विकारा वरील उपचारासाठी डॉ. नीरज काळे ( हृदयशस्त्रक्रिया तज्ञ), डॉ. महेश आहेर (कार्डिओलॉजिस्ट) हे तज्ज्ञ डॉक्टर आहेत. तसेच इतर आजारावर डॉ. शशांक तुसे(एम डी मेडिसिन) , डॉ. सायली ठोंबरे(एम डी मेडिसिन) हे सेवा देण्यासाठी पूर्ण वेळ उपस्थित असतात.
गेल्या चार वर्षापासून श्री. जनार्दन स्वामी हॉस्पिटलच्या माध्यमातून विविध आजारावरील उपचारासाठी नवीन व अत्याधुनिक यंत्र सामग्रीद्वारे ग्रामीण भागातील रुग्णांना उत्तमोत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न सुरु आहे.