कोपरगावकरांनो दिवाळीची ऑनलाईन खरेदी टाळा; आपली बाजारपेठ फुलवा – नगरसेवक कदम
Kopargaonkars avoid online shopping for Diwali; Flourish your market – corporator Kadam
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sat 23 Oct 2021,20:18Pm.
कोपरगाव : गेल्या काहि महिन्यापासुन कोरोनामुळे कोपरगावची बाजारपेठ अनेक चढउतारातुन जात आहे. त्यामुळे बाजारपेठेला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी दिवाळीची ऑनलाईन खरेदी टाळा, आपली बाजारपेठ फुलवा आपल्या शहरातील अनेक छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना आर्थिक मदतीचा हातभार लावा असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे नगरसेवक जनार्दन कदम यांनी केले आहे.
जनार्दन कदम पुढे म्हणाले, धकाधकीच्या आयुष्यात बाजारात जाणे, गाडी पार्क करून खरेदी करणे, यासाठी दोन-तीन तास देणे अशक्य झाले आहे. कुटुंबासह खरेदीला जाणे जवळपास बंद होत आहे. लोकांकडे वेळच नसल्याने ऑनलाइन खरेदीचा ‘ट्रेण्ड’ सध्या जोमात आहे. घरबसल्या एका क्लिकवर होणारी ऑनलाइन खरेदी ही सहज, सोपी आणि आरामदायी वाटते. मात्र, काही कंपन्यांच्या विचित्र कारभारामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो. तो ठरू नये, त्याचबरोबर आपल्या शहरातील छोटे-मोठे व्यापारी यांना दिवाळी हा वर्षाचा एकमेव मोठा सण असल्याने वर्षभराचे आर्थिक नियोजन त्यावर ते अवलंबून असते कोरोना काळामुळे गेली दोन वर्ष हे छोटे छोटे व्यापारी संघर्ष करीत आहे. हातावर पोट भरणा-या नागरिकांची जगण्यासाठी धडपड सुरु आहे . या परिस्थितीत अनेक मजुर व हातावर पोट भरणारे कुटुंब यांना उदरनिर्वाह करणे अवघड झाले होते. आजही तीच परिस्थिती बघण्यास मिळत आहे. या संघर्षात त्यांना मदत करणे हे आपले सामाजिक दायित्व आहे या भूमिकेतून आपण यावेळी दिवाळी सणाची सर्व खरेदी आपल्या शहरातील बाजारपेठेत करावी यासाठी ग्राहकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज असते.